जीवनात सम्यक मार्ग निवडा,तो बहुजनांच्या सुखाचा मार्ग - भन्ते सुद्दसन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 February 2020

जीवनात सम्यक मार्ग निवडा,तो बहुजनांच्या सुखाचा मार्ग - भन्ते सुद्दसन

जीवनात सम्यक मार्ग निवडा,तो बहुजनांच्या सुखाचा मार्ग - भन्ते सुद्दसन

किनवट :  सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका.सम्यक मार्ग हा केवळ थोडक्याच्या सुखासाठी नाही.तो बहुजन सुखासाठी आहे.तो प्रारंभी, मध्य आणि शेवटीही कल्याणप्रद आहे,म्हणून सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौध्द जीवनमार्गाचे अनुसरण होय,असे मौलिक प्रतिपादन पुणे येथील पाली आणि बौध्द अध्ययन केंद्राचे संचालक  भन्ते सुद्दसन यांनी केले.



 शनिवारी (ता.२२)समतानगर येथे आयोजित १० व्या जागतिक बौध्द धम्म परिषदेत ते उपस्थित बौध्द उपासकांना धम्मदेसना देत होते.मंचावर म्यानमार येथील भदन्त चन्दिमा, भदन्त थ्यन, व्हिएतनाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

    दुसऱ्या सत्रात धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात   आले.या प्रसंगी दिल्ली येथील सुनील सरदार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख महेश भारतीय , भारत वाघमारे, अँड.सुभाष ताजने, प्रा. डाॅ.हमराज ऊइके, गब्बर काजी, नानासाहेब भवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   प्रारंभी स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे यांनी उपस्थित भन्ते व मान्यवरांचे स्वागत केले.हिंदु मुस्लिम असा भेदभाव करून देशाला विभाजित करणारी व्यवस्था सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.मात्र, आम्ही तथागताच्या मार्गाने व फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने समता , बंधूता आणि न्याय प्रस्तापीत करण्यासाठी लढत आहोत, लढत राहनार ,असे मत सुनील सरदार यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या सत्रात महेश भारतीय, प्रा.हमराज ऊइके यांनीही  भारत सरकारच्या जनविरोधी धोरणावर कडाडून टीका केली.विषमतावादी व्यवस्थेपासून वाचायचे असेल तर  संविधानाच्या रक्षणासाठी पुढे या ,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तिसऱ्या सत्रात आंबेडकरी शाहिरी जलशाने उपस्थितांची मने जिंकली.चौथ्या सत्रात भारतात संविधानाच राजकारण कस सुरू होईल? या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.यात प्रा.सतेश्वर मोरे, डॉ. राजेंद्र गोनारकर, छायाताई खोब्रागडे, नागपूर, किशोर चहान्दे यांचा सहभाग होता.त्यानंतर कवी संमेलन, मुक्तसंवाद, तर रात्री आंबेडकरी सांस्कृतिक संध्यामध्ये सुप्रसिद्ध गायक अशोक निकाळजे, आकाश राजा गोसावी , गौतम पवार, नांदेड, रिता खांडरे, अकोला, प्रकाश बाबू काळमकर यांनी बहारदार भीम गीते सादर केली.
मुख्यसत्राच्या प्रास्ताविक भाषनातून राजू शेळके यांनी धम्म परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.गजानन सोनवने, राजा तामगाडगे यांनी केले तर, राहुल महाबळे, दया पाटील, प्रा. सुबोध सर्पे  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages