प्रलंबित घरकुल अनुदानाचे लाभार्थ्यांना वाटप; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने यंत्रणा गतिमान. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 February 2020

प्रलंबित घरकुल अनुदानाचे लाभार्थ्यांना वाटप; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने यंत्रणा गतिमान.

प्रलंबित घरकुल अनुदानाचे लाभार्थ्यांना वाटप; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने यंत्रणा गतिमान.

 किनवट : येथील प्रलंबित असलेल्या ४१८ घरकुल लाभार्थ्यांना खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अनुदान मंजूर होऊन राज्य आणि केंद्र शासनाचे असे एकूण १लाख ६० हजार रुपयाच्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे .
           हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आजवर हिंगोली मतदार संघातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागले असून  विकासकामांना प्राधान्य दिले आहे . सर्व सामान्य जनतेची कुठेही अडवणूक होऊ नये याबाबत सर्व विभागांना सांगितले आहे . किनवट तालुक्यातील ४१८ घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान मागील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते, खासदार हेमंत पाटील यांच्याकडे याबाबतची तक्रार गेल्यानंतर  त्यांनी तात्काळ या प्रकरणाचा  पाठपूरावा करून  अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे असे  सांगितले . या घरकूल योजनेमधील लाभार्थ्यांना  २ लक्ष  ५० हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून त्यानुसार ४१८ लाभार्थ्यांना राज्य सरकारचे  १ लक्ष रुपये आणि केंद्र सरकारचे ६० हजार असे एकूण १ लाख ६० हजार रुपये अद्याप पर्यंत मिळाले  आहेत तर उर्वरित ९० हजार रुपये केंद्र सरकारकडून लवकरच  मिळणार  आहेत . खासदार हेमंत पाटील यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करून अनुदान मंजूर करून दिले त्याबद्दल लाभार्थ्यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत . किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील  मागील ३७ वर्षांपासून  ८९ भूखंड धारकांचे भूखंडाचा  प्रश्न प्रलंबित होता त्याबाबत सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता त्यानंतर तात्काळ लाभार्थ्यांना भूखंडाचे वाटप करण्यात आले होते . मतदार संघाचा विकास आणि सर्व सामान्य जनतेचे  हित याबाबत खासदार हेमंत पाटील सदैव पुढाकार घेत असतात .

No comments:

Post a Comment

Pages