प्रा.मनोहर थोरात यांना पीएच.डी.प्रदान. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 February 2020

प्रा.मनोहर थोरात यांना पीएच.डी.प्रदान.प्रा.मनोहर थोरात यांना पीएच.डी.प्रदान.


किनवट : येथील सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक मनोहर कुंडलीकराव थोरात यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने पीएच. डी. पदवी नुकतीच देण्यात आली आहे.
          थोरात यांनी 'नांदेड जिल्ह्यातील मथुरा लभाण विमुक्त भटक्या जमातीच्या सामाजिक जीवनाचे समाजशास्त्रीय अध्ययन,'या विषयावर शोध प्रबंध सादर केला. मुख्य मार्गदर्शक डॉ. शामल देशमुख  व डॉ. रामचंद्र भिसे यांनी मार्गदर्शन सहाय्य केले. या यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्था अध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार, उपाध्यक्ष नरसिंगराव सातूरवार व ऍड शंकरराव राठोड सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, मुख्याध्यापक मुकुंदराव तिरमनवार,प्राचार्य डॉ. किरण पाईकराव ,समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. विवेक चनमनवार आदिंसह सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी,शिक्षक तथा विध्यार्थी, मित्र ,नातेवाईक यांनी प्रा.डाॅ.थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages