देशभरातील जवळपास 25 स्वयंसेवी संघटनांनी ४ मार्चला 'चलो दिल्ली’ ची हाक दिली आहे.
देशभरात आंदोलनं सुरू असताना केंद्र सरकार या विरोधाला जुमानत नाही. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) तसंच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी उपक्रम (NRC) विरोधात देशभरातील आंदोलकांना जंतरमंतरवर एकत्रित करणार आहेत. आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. विविध राज्यांमध्ये सुरु असलेली आंदोलनं राजधानीत झाली पाहिजे.न्यूज18लोकमतने हीबातमी दिली आहे. अशी भूमिका आंदोलकांची असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांसोबत केंद्र सरकारनं चर्चा करण्याची तसदी घेतली नाही. सरकारला जाब विचारण्यासाठी तसंच कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी शाहीनबाग प्रमाणे देशभरात आंदोलन करणाऱ्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. आंदोलनात कुठलाही राजकीय पक्ष सहभागी होवू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केल आहे. एनआरसीमुळे देशभरातील जवळपास 40 टक्के हिंदू प्रभावित होतील असा दावा आंबेडकरांनी केला आहे. मोर्च्यात सहभागी होणाऱ्या संघटनांची नावं सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. व्यापारी, उद्योजक ज्याप्रकारे दहशतीत आहेत त्याचप्रमाणे आंदोलकही दहशतीत आहेत. आंदोलनापूर्वीच त्यांना अटक केली जावू शकते असंही ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं जाणार असल्याचंही ते म्हणाले.कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसनंही भूमिका स्पष्ट करावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे. १ मे पासून महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी उपक्रमही (एनपीआर) लागू करण्यात येईल. त्यामुळे सत्तेत असलेल्या कॉंग्रेस तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेसने याप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंबेडकरांनी केली.
No comments:
Post a Comment