नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पी.शिवशंकर यांची नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 February 2020

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पी.शिवशंकर यांची नियुक्ती

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पी.शिवशंकर यांची नियुक्ती

नांदेड:
नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची बदली करण्यात आली असून डोंगरे यांच्या रिक्त झालेल्या जिल्हाधिकारीपदी परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तीन वर्षांपेक्षा अधिक काळ नांदेड सेवा बजावलेल्या अरुण डोंगरे यांची अखेर आज बदली झाली . अरुण डोंगरे यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या काळात अनेक घोटाळे उघडकीस आले शिवाय डोंगरे अनेक वादविवादातही सापडले होते . खास करून राज्याला हादरवून सोडणाऱ्या धान्य घोटाळ्यात आणि अवैध वाळू व्यवसायातही जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे यांच्या बद्दल अनेक वाद विवाद निर्माण झाले होते. असे असले तरी डोंगरे यांनी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केला.आज दिनांक १३ रोजी त्यांची बदली करण्यात आली असून नूतन जिल्हा अधिकारी म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पी. शिवशंकर यांनी २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी म्हणून यश मिळविले होते. वर्धा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
त्यानंतर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. परभणी येथे ३ एप्रील २०१७ पासून परभणीचे जिल्हा अधिकारी म्हणून रुजू होते.

No comments:

Post a Comment

Pages