सिध्दार्थ गौतम बुध्द : जीवन व कार्य या विषयावरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य निबंध स्पर्धा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 February 2020

सिध्दार्थ गौतम बुध्द : जीवन व कार्य या विषयावरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य निबंध स्पर्धा.

सिध्दार्थ गौतम बुध्द : जीवन व कार्य
या विषयावरती
महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य निबंध स्पर्धा.

कोल्हापूर : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी निबंध स्पर्धा
"सिध्दार्थ गौतम बुध्द : जीवन व कार्य",
या विषयावरती आयोजित करण्यात आली आहे.
 निबंध स्पर्धेतील बक्षिसे :
प्रथम बक्षीस 5,00,000/- (पाच लाख रुपये),1,00,000/- रु. रोख, सन्मानचिन्ह आणि 4 लाखांची पुस्तके,द्वितीय बक्षीस
3,00,000/- (तीन लाख रुपये) यात
50,000/- रु. रोख, सन्मानचिन्ह आणि 2.5 लाखांची पुस्तके,तृतीय बक्षीस 1,50,000/- (दिड लाख रुपये यात 25,000/- रु. रोख, सन्मानचिन्ह आणि 1.25 लाखांची पुस्तके उत्तेजनार्थ पन्नास बक्षिसे यात
प्रत्येकी 5 हजारांची पुस्तके,तसेच   सर्व सहभागी परीक्षार्थींना
आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येतील.
       निबंध स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 राहील,तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2020 अशी राहील.प्रवेश फी 300/- रु. राहील.
   
निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या 09921864129, 08788103877, 09665468662 या WhatsApp नंबरवर संपर्क साधतांना "निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा"असा मेसेज पाठवा,असे आवाहन करण्यात आले आहे.
  स्पर्धेच्या नियम व अटी अशा आहेत:
1. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती-धर्माचे बंधन नाही.
3. निबंध मराठी भाषेत आणि 4 ते 5 हजार शब्द मर्यादित असावा.
3. "सिध्दार्थ गौतम बुध्द : जीवन व कार्य", या अनुषंगाने विविध पैलूंवर विवेचन स्वलिखित (अक्षर परीक्षकांना कळणारे असेल तर) अथवा टाईप करुन निबंध karunaminchekar@gmail.com या ईमेलवर (PDF व OPEN फाईल) पाठवावा, एक कॉपी समक्ष भेटून द्यावी किंवा पोस्टाने पाठवावी.
5. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी  30 एप्रिल 2020 पर्यंत 300/- रु. प्रवेश फी भरुन करणे बंधनकारक राहील.
6. नाव नोंदणी करणार्‍यांनी चेक, डी. डी. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर या नावे काढावा अथवा रोखीने अदा करावे.
7. कोल्हापूर बाहेरील स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी फी खालील खातेवर भरुन पावतीसह, संपूर्ण नाव, पत्ता व भरलेला फॉर्म 09921864129, 08788103877, 09665468662 या WhatsApp नंबरवर व वरील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.
8. रोख रक्कम पाठवणार्‍यांनी
आय. डी. बी. आय. बँक,
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट,
खाते क्रमांक :
0464104000154239
IFSC Code : IBKL0000464
MICR : 416259005
सेव्हिंग खाते, शाहुपुरी शाखा,
कोल्हापूर
या खातेवर जमा करावी 9. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.
निबंध अर्ज भरण्याचा व निबंध पाठवण्याचा पत्ता: धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा,
राजाराम रोड, उमा टॉकीज चौक,
कोल्हापूर-416002 अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा ; करुणा मिणचेकर -
09921864129,दयानंद ठाणेकर-
08788103877 ,विमल पोखर्णीकर
09665468662.

No comments:

Post a Comment

Pages