रमाई जयंती व माघ पौर्णिमे निमित्त सांस्कृतीक कार्यक्रम. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 February 2020

रमाई जयंती व माघ पौर्णिमे निमित्त सांस्कृतीक कार्यक्रम.

रमाई जयंती व माघ पौर्णिमे निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम.

किनवट : सिध्दार्थ नगर येथील जेतवन बुध्द विहारात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी त्यागमुर्ती रमाई आबेंडकर यांची १२२वी जयंती व माघ पौर्णिमेचे औचित्य साधुन सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन आज (दि.१२) करण्यात आले होते.
    कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिक्षा ठमके यांनी बुद्ध वंदना घेतली. नंतर शालेय विद्यार्थी कावेरी ,तनुजा कावळे , चैताली पाटील , दिक्षा पाटिल ' आत्मश्री पाटिल, स्वरा भरणे , सृष्टी मुनेश्वर , निल अंबर ठमके, या विद्यार्थ्यानी "बाबासाहेबांची रींगटोन" व "श्री बुद्धाच्या चरणावरती" या गितावर समुह नृत्य केले. तसेच रितीका ठमके व निल ठमके या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. या समुह नृत्याचे कोरीओग्राफ प्रतिक्षा ठमके व वसुंधरा सोनकांबळे यांनी केले. या कार्यक्रमास सुमीत्रा कावळे, संगीता पाटील,ललीता मुनेश्ववर , जयमाला आळणे,दसराबाई भरणे,राहीबाई पाटील,सूधाबाई परेकार,वनीता पाटील, योजना पाटील, शोभा भवरे, वर्षा ठमके,रोहीणी मूनेश्वर,चागुंणा कावळे , सुजाता भरणे , सविता भरणे , इंदिरा ठमके ' लक्ष्मी पाटील, प्रज्ञा ठमके ,     सारजा कावळे' माला नगारे , सुशीला ठमके, शेशीकला कावळे व सिद्धार्थ नगर नवयुवक मंडळाचे राजेश पाटील ,युवा पँथर संघटनेचे पदाधीकारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पाटील यांनी केले.  कार्यक्रमानंतर खिरदान व अल्पोहार देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages