किनवट व माहूर तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढविणार - आमदार भीमराव केराम यांची ग्वाही - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 February 2020

किनवट व माहूर तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढविणार - आमदार भीमराव केराम यांची ग्वाही

किनवट व माहूर तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढविणार - आमदार भीमराव केराम यांची ग्वाही



किनवट :  किनवट व माहूर तालुक्याचे सिंचन क्षेत्र अत्यल्प असल्यामुळे अधिकतर शेतकऱ्यांना निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या कोरड वाहू शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागतो. ही बाब लक्षात घेवून आपण ओलीत क्षेत्रात वाढ करण्यावर अधिक भर देत असून गुंडवळ तलावा वरील कॅनॉल दुरुस्तीचे काम हे त्याचे प्रमाण आहे.त्या तलावातील पाणी शेती पर्यंत पोहचल्याने त्या परिसरातील शेती ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. अनेक वर्षा पासून रखडलेल्या मनिरामथड प्रकल्पावरही आपण सध्या लक्ष केंद्रित केले असून या वर्षीच्या जून अखेर त्यावर फाटक बसवून पाण्याची साठवण केल्या जाईल, अशी ग्वाही आ.भीमराव केराम यांनी  दिली.
   स्थानिक नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या मनिरामथड प्रकल्पास गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद ने दि.१६/११/२००५ ला प्रशासकिय मान्यता दिली होती. महामंडळाने दि. 5/3/2019 रोजी द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देवून रु.९७.२९ कोटी रुपयाची तरतूद केली.
नांदेड जिल्हयाच्या गोदावरी खोर्‍यातील पैंनगंगा उपखोर्‍यात माहूर तालुक्यातील मनिरामखेड येथे उभारण्यात येणाऱ्या माती धरणाची लांबी २४०५ मीटर तर महत्तम उंची १७.११मीटर एवढी निश्चित केली आहे.
शीर्ष विमोचक – विहीर पध्दतीचे असणार आहे. २०० मी.लांबी व पुंडी पद्धतीच्या द्वारविरहीत सांडव्यातून ८०२.१०९ घमी /से.मी एवढ्या पाण्याचा विसर्ग होणार आहे.या प्रकल्पात ११.८६६ द.ल.घ.मी.एवढा पाणी साठा उपलब्ध असणार आहे.त्याची सिंचन क्षमता – १२०० हेक्टर इतकी तर १०.९१द.ल.मी ( मुख्य अभियंता,नियोजन व जलविज्ञान,यांचे प्रमाणपञ क्र.गो.पैंनगंगा/१०८/दि.०२/०२/२००५)नुसार उपलब्धता राहणार असून ३२ किमी.च्या बंद नलीकेतून वितरण प्रणाली राबविली जाणार आहे.त्यासाठी २८.८० कोटी रूपयाच्या निधीच्या तरतुदीस व्दितीय सुप्रमा नुसार मंजुरी देण्यात आली आहे.
८.४९ द.ल.घ.मी.पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्या जाणार आहे. बाष्पीभवन क्षमता २.४२.द.ल.घ.मी.एवढी असणार आहे.एकूण ११.८६६ द.ल.घ.मी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पातून माहुर तालुक्यातील वसराम नाईक तांडा,सिंदखेड,रामपुर,चिंचखेड,सतीगुडा,लोकरवाडी,वायफणी,करंजी,धानोरा,पाथरी या गांवातील जमिनीस सिंचनाचा फायदा होणार आहे.
प्रकल्पावर माहे नोव्हें. २०१९ अखेर रु.४९.८२ कोटी खर्च झाला असून ४८.२६ कोटी रुपयाचे काम शिल्लक आहे.सद्यास्थितीत धरणाच्या दोन्ही तिरावरील भराव कामे,सांडव्याचे काम व दोन मुख्य विमोचकाचे काम पुर्णं झाले आहे.
प्रकल्पासाठी लागणार्‍या ३१०.८४ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्णं करण्यात आले आहे.
वायफणी ता.माहुर हे गांव १०० टक्के बुडीत क्षेत्रात येत असल्याने सदर गांवाचे पूनर्वसन ग्रामपंचायतच्या ठरावानुसार त्याच शिवारात करण्याचे ठरले आहे.524 लोकसंख्या असलेले 234 कुटूंब बाधीत होणार असून त्यात शेतकरी खातेदार ७२,बिगर शेतकरी खातेदार १५५ असून सरकारी व निमसरकारी मालमत्ता ७ इतकी आहे.नवीन गांवठाणसाठी गट नं.६६,६७,६८,६९,७०,७१,७२,७३,७४ व ७५ मधील १३.५१ हेक्टर एवढ्या क्षेञावर पूनर्वसन होणाऱ्या गावा करीता सुविधा निर्माण करण्याचे काम मे.अनुसया कंन्स्ट्रंक्शन कंपनी नांदेड मार्फत बी-१/२ सन २०१८-२०१९ निविदे व्दारे करण्यात येत असून काम प्रगती पथावर आहे.
पुनर्वसन कामा करीता मूळ निविदा किंमत ५५५.६५ लक्ष असून स्विकृत निविदा किंमत ६४४.५५ लक्ष आहे.माहे सप्टेंबर २०१९ अखेर कामावर रु ३३९ लक्ष एवढा खर्च झालेला आहे.कामाची उर्वरीत किंमत ३०५.५५ लक्ष आहे.सदर कामाची मुद्दत १२/०८/२०१९ पर्यंत होती त्या नंतर ती वाढविण्यासाठी दि. ३१/१०/२०१९ पर्यंत प्रथम मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. करारनाम्यात खालील बांधकामे,इमारती व इतर नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
ओलीत क्षेत्रात होणारी वाढ आणि अनेक गांवच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर करणाऱ्या प्रकल्पास सन 2005 ला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, तत्का. आघाडी कॉँग्रेस सरकारने त्याकडे अजीबात लक्ष दिले नाही.परंतु, या भागतील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन फडणवीस सरकारने या प्रकल्पाच्या कामास वाढीव निधीची तरतूद करून कामास प्रगती दिल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बेगडी कळवळा दाखविणा-या नेत्यांचे प्रेम किती तकलादू असते.याची अनुभूती मनिरामथड प्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरून माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages