निधन वार्ता: माजी नगरसेवक पुंडलिक कावळे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 29 February 2020

निधन वार्ता: माजी नगरसेवक पुंडलिक कावळे यांचे निधन

निधन वार्ता

निरपेक्षपणे तहहयात समाजसेवा करणारे माजी नगरसेवक तथा सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता पुंडलीक कावळे यांचे निधन ; रविवारी ( ता. 1 मार्च ) दुपारी 1 वाजता किनवट येथे अंत्यविधीकिनवट :
सिध्दार्थनगर, किनवट येथील रहिवाशी, निरपेक्षपणे तहहयात समाजसेवा करणारे माजी नगरसेवक तथा सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता पुंडलीक कावळे ( वय 88 वर्षे ) यांचे शनिवारी ( ता. 2 मार्च ) रात्री 8 वाजता नांदेड येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव किनवट येथे आणले आहे. बुध्दपुतळा परिसर, समतानगर, किनवट येथील त्यांचे बंधू वामनराव कावळे यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून किनवट - माहूर महामार्गावरील बस स्थानकाजवळील बौध्द स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर  रविवारी ( ता.1 मार्च ) दुपारी 1 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात मुलगा बांधकाम व्यावसायीक अरूण कावळे, मुलगी प्रज्ञा पोपुलवार, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
        निरपेक्षपणे सतत पंधरा वर्षे किनवट नगर परिषदेचे नगरसेवक पद भुषवून सिध्दार्थनगर, किनवट येथील जेतवन बुध्द विहारासाठी जागा उपलब्ध करुन सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांचे हस्ते भूमिपुजन करणारे, किनवट शहरात राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तालुक्यातील पहिली जयंती साजरी करण्यासाठी बैलगाडीतून तैलचित्राची मिरवणूक काढणारे असा लौकिक असणारे पुंडलिक कावळे यांना क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने 2018 मध्ये 'जीवन क्रांतीरत्न पुरस्काराने ' गौरविण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Pages