बाबासाहेब , अण्णाभाऊ आणि फकिरा ...!!! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 29 February 2020

बाबासाहेब , अण्णाभाऊ आणि फकिरा ...!!!

बाबासाहेब , अण्णाभाऊ आणि फकिरा ...!!!



साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांची १ मार्च १९५९ रोजी प्रसिद्ध केलेली           " फकिरा " ही कादंबरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली आहे.

आजचा दिवस संयुक्त राष्ट्र संघ भेदभाव मुक्त दिवस म्हणून साजरा करतं .बाबासाहेबांनी संविधानातील कलाम  १८ मध्ये यांचं तत्वाचा समावेश केला आहे . कोणत्याही करणावरून नागरिकांत भेदभाव केला जाणार नाही असं आश्वाशीत केलंय .

असो बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणावर दिसतो , तसा त्यांच्या विचारांवर गौर्कि , मार्क्स यांच्या विचारांचीही प्रभाव होता . तथापि ,  कालांतरानं ते बाबासाहेबांच्या विचारानं भारावलेले दिसतात आणि त्या विचारांचा अंगीकार करून त्यासंकल्पनेचे साहित्य ते निर्माण करताना दिसतात . त्यांच्या कथा , कादंबऱ्या बरोबरच शाहिरी आणि कवितांतून ते आंबेडकरी विचारांची पेरणी करतात . " सापळा " आणि " वळण " या तसेच इतर  कथांतील पात्र बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली , त्या विचराबरहुकूम जीवन जगतांना अण्णाभाऊंनी समृद्धपणे उभी केली आहेत .

तसेही अण्णाभाऊ १९५६ मध्ये डाव्या विचारसरणीच्या पक्षातून बाहेर पडले . असं म्हणतात याच काळात त्यांना आंबेडकरी चळवळ आणि विचार आपलासा वाटू लागला .म्हणूनच त्यांनी फकिरा ही कादंबरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली . एवढेच नव्हे तर एका गीतात ते जग बदलण्याचं सुत्रच बाबासाहेबांनी मला सांगितल्याचे व्यक्त होतात . अण्णाभाऊ म्हणतात ...

      जग बदल घालून घाव
       मला सांगून गेले भीमराव
       एकजुटीच्या या रथावरती
       आरूढ होऊन चल बा पुढती
       नवं महाराष्ट्र  निर्मू जगती
        करी प्रगट निज गाव ...
       मला सांगून गेले भीमराव ...

सकल्यानं विचार केल्यास अण्णाभाऊंच्या साहित्यातून पदोपदी आंबेडकरी विचारांचा धागा विणलेला दिसून येतो .
 फकिरा कादंबरीतील नायक असलेला फकिरा  हा अस्पृश्य समाजातील पहिला नायक आहे जो   शोषणाविरुद्ध केवळ चिंता व्यक्त न करता त्याच्याशी दोन हात करण्याची कृती करतो . यापूर्वीच्या कथा आणि कादंबरीकारांनी हीन दीन , लाचार आणि व्यवस्थेचा पाईक होत नशिबाला दोष देणारे नायक चित्रित केले.
अण्णाभाऊंचा फकिरा खूप भिन्न आहे . " मंगला " नंतरची ' फकिरा ' ही अण्णा भाऊंची सर्वोत्कृष्ट कलाकृती होय . फकिरामध्ये अण्णा भाऊंच्या लेखनगुणाचा परमोत्कर्ष आढळतो . या कादंबरीने अण्णा भाऊंच्याभोवती प्रकाशवलय तेजाळत ठेवण्याचे काम केले .

 या कादंबरीबरोबर स्वतःची कैफियत सादर करताना अण्णा भाऊ म्हणतात . " फकिराविषयी थोडं सांगावं महणून लिहीत आहे . ते असं की , ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेनं निर्माण केली नाही . प्रतिभेला सत्याचं , जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा , अनुभूती हे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे . सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते . मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत अण्णा भाऊ साठे : समाज विचार आणि साहित्यविवेचन  नाही ... जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर पण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही . . . . हा फकिराही माझा होता . . साकार नाही त्याला आकार देण्याचे सामर्थ्य माझ्या ठायी नाही . जे पाहिलं . कल तेच मी लिहिलं आहे . त्यातून फकिरा निर्माण झाला आहे . डोंगरात नि गाच्या पायथ्याला विस्कटलेलं , फकिराचं कर्तृत्व एकत्र करून मी हा इमला उभारला आहे . एवढचं . . . . जेव्हा फकिराची घोडदौड सुरू होती तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो . त्या रात्री भरमध्यान्हीला तो भरधाव धावत आला औला त्याने इंग्रजी खजिना लुटला होता . दारात येऊन त्यानं आप्पाला हाक मारली . आप्पा घरी नव्हता म्हणून आत्या ( आक्का ) दारी आली , आणि तिनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली . ती ऐकताच त्यानं ओटीतून दोन ओंजळी सरती रुपये आक्काच्या ओटीत घातले आणि बाळ - बाळंतिणीची काळजी घ्या असं म्हणून तो घोड्याला टाच मारत निघून गेला . त्याच्या घोड्याच्या टापा आक्काने ऐकल्या . तो आत्मसमर्पणाची वाट कसा चालला हेही मला उशिरा समजलं . ज्या तरवारीच्या धारेनं त्यानं बाबरखानला जागोजाग आडवला ती तरवार मला पुष्कळ दिवसानंतर पाहता आली . . . . . . . त्यानं माझ्यावर उपकार केले होते . त्याच्या पैशाची मी घुटी गिळली होती . सुरती रुपयांच्या दोन ओंजळी माझ्यावर उधळून तो गेला होता . त्याला मी कसा विसरणार ? याचा मी विचार करीत होतो . अखेर ज्ञानेशाच्या , तुक्याच्या , तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा तिचं भांडार लुटून त्या दोन ओंजळीची फेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे . हेतू एवढाच की , जो उपेक्षित होता , अंधारात होता

No comments:

Post a Comment

Pages