एनआरसी,सीएए व एनपीआर च्या विरोधात माहूर मध्ये भव्य रॕली व जाहीर सभा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 February 2020

एनआरसी,सीएए व एनपीआर च्या विरोधात माहूर मध्ये भव्य रॕली व जाहीर सभा.

एनआरसी,सीएए व एनपीआर च्या विरोधात माहूर मध्ये भव्य रॕली व जाहीर सभा.


माहूर : दि.१८ फेब्रुवारी रोजी  मंगळवारी माहूर (जि.नांदेड) येथे NRC, CAA, NPR विरोधात जोरदार रॕली व सभा झाली. पश्चिम बंगालचे माजी मंत्री व माजी खासदार कॉ. महंमद सलीम (पॉलिटब्युरो सदस्य, मा.क.प.) आणि मा.क.प. केन्द्रीय कमिटी सचिव मंडळ सदस्य व अ.भा.किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नाशिक-मुंबई किसान लाँग मार्च चे प्रणेते कॉ.डॉ.अशोक ढवळे यांना सर्वपक्षीय जाहीर सभेसाठी मुख्य वक्ते म्हणून निमंत्रण  दिले होते.

  टी पॉईंट येथून रॕली काढून नगर पंचायत छ.शिवाजी चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.क.प.नांदेड जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम होते.


सभेसाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पत्रकार कादर दोसानी यांनी केले. प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूरचे माजी नगराध्यक्ष राजेन्द्र केशवे, कॉ. अर्जून आडे, कॉ.किशोर पवार, कॉ.प्रल्हाद चव्हाण, डॉ. बाबाराव डाखोरे यांची  होती. ही जाहीर सभा व रॕली यशस्वी करण्यासाठी "हम भारत के लोग" मंच माहूर व मा.क.प. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भा.री.प. सह पुरोगामी संघटनांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Pages