प्रलंबित उपकेंद्रांच्या कामासाठी आ. केराम यांचा उर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा.... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 February 2020

प्रलंबित उपकेंद्रांच्या कामासाठी आ. केराम यांचा उर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा....

प्रलंबित उपकेंद्रांच्या कामासाठी आ. केराम यांचा उर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा....




माहूर येथील १३२ के.व्ही. व किनवटचे ३३ के.व्ही उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी...

किनवट, प्रतिनिधी
माहूर येथील महापारेषण कडून प्रलंबित असलेले १३२ उपकेंद्राचे काम व किनवट तालुक्यातील कनकी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राचे प्रलंबित प्रलंबित असलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. केराम यांचा राज्याच्या उर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असून सदर कामे तातडीने सुरू करण्याचे आदेशीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  माहूर येथील प्रस्तावित मंजूर असलेले १३२ के.व्ही. उपकेंद्रासाठी नव्याने जागा संपादित करून देखील उपकेद्राचे काम अद्याप रखडलेले आहे. तर सन २०१९ - २० वर्षात आदिवासी उपयोजना अंतर्गत प्रकल्प अधिकरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्याकडून १ कोटी ९२ लक्ष रूपयाचा निधी किनवट तालुक्यातील मौजे कनकी ता. येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रासाठी कार्यकारी अभियंता महावितरण विभागीय कार्यालय भोकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
 असे असताना माहूर व कनकी येथील दोन्ही ठिकाणच्या उपकेंद्रांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी कनकी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राचे प्रलंबित काम त्वरीत सुरू करण्यासाठी मुख्य अभियंता परिमंडळ नांदेड यांना तर माहूर येथील १३२ के.व्ही. उपकेंद्राचे काम सुरू करण्यासाठी मा. महाव्यवस्थापकीय संचालक महापारेषण सांघिक कार्यालय मुंबई यांना आदेशीत करण्याची  मागणी आमदार भिमरावजी केराम यांनी राज्याचे उर्जामंत्री मा.ना. डॉ.नितीनजी राऊत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages