आता पाच दिवसांचा आठवडा, शनिवारी व रविवारी सुट्टी. सरकारी कार्यालयाची वेळ सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी सव्वा सहा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 25 February 2020

आता पाच दिवसांचा आठवडा, शनिवारी व रविवारी सुट्टी. सरकारी कार्यालयाची वेळ सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी सव्वा सहा

आता पाच दिवसांचा आठवडा, शनिवारी व रविवारी सुट्टी.
सरकारी कार्यालयाची वेळ सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी सव्वा सहा

मुंबईः राज्यातील कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून होणार असून या दिवसापासून सरकारी कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 वाजेपासून सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत राहणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आठवड्यातील पाच दिवस सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळही 45 मिनिटांनी वाढवण्यात आली होती.

 पाच दिवसांचा आठवडा करण्याची राज्य सरकारी कर्मचार्‍यांची अनेक दिवसांपासूनचीू प्रलंबित मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने पूर्ण केली. सरकारने या संबंधीचा शासन निर्णय जारी केला असून त्यात सरकारी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

29 फेब्रुवारीपासून सर्व शनिवार आणि रविवारी सरकारी कार्यालयांना सुटी राहील. सोमवार ते शुक्रवार सरकारी कार्यालयाचे कामकाज सकाळी 9.45 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6.15 वाजता संपेल. सर्व कार्यालयांतील शिपायांसाठी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत राहील. या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान जास्तीत जास्त 30 मिनिटांचा भोजनाची सुटी असेल. ज्या सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही, अशा कार्यालयांची यादीही या शासन निर्णयात देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली कार्यालये आणि शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलिस, अग्निशमन दल आणि सफाई कामगार आदींना पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.

No comments:

Post a Comment

Pages