जयसिद्धेश्वर स्वामी यांचे मूळ जातप्रमाणपत्र हिंदू लिंगायत असून त्यांनी बेडाजंगम जातीचे बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवर 15 फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. जयसिद्धेश्वर स्वामींच्या जातप्रमाणपत्र तपासणीसाठी नियुक्त दक्षता समितीने तपास करून अहवाल सादर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचे दक्षता समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. जातपडताळणी समिती दबावाखाली काम करत असल्याचा स्वामी यांच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावत जातपडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचे जातप्रमाणपत्र अवैध असल्याचे जाहीर केले.
भाजपने शरद बन्सोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत समाजातील अध्यात्मिक गुरू जयसिद्धेश्वर स्वामींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे रिंगणात होते. या निवडणुकीत सिद्धेश्वर स्वामींचा विजय झाला होता.
No comments:
Post a Comment