आंबेडकरी जनतेला सत्ताधारी करण्यासाठी प्रजासत्ताक पक्षाची स्थापना ; सुरेशदादा गायकवाड यांची घोषणा.
नांदेड : किनवट येथून दलित पँथर चळवळीतून आपल्या सामाजिक कार्याची कारकीर्द सुरू करणारे आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी शनिवारी ता 8 नांदेड येथे प्रजासत्ताक पार्टी स्थापना केल्याची घोषणा केली.
आपल्या कणखर बाण्यांनी आंबेडकरी विचार पेरत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेले नामांतर लढ्यातील नेते तथा आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी शनिवारी ता. 8 शाशकीय विश्रामगृह ,नांदेड येथे आपल्या जिवाभावाच्या खंबीर कार्यकर्त्यांना एकत्र करून बैठक घेतली .सर्वांशी विचारविनीमय करून आजच्या विषक्त परिस्थितीत नव्या जोमानं महाराष्ट्रभर क्रियाशील कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी प्रजासत्ताक पार्टीची स्थापना करीत असल्याची घोषणा केली.
यावेळी जेष्ठ नेते पी.एस.गवळे प्रा.देविदास मनोहरे, जनार्धन कवडे,बी बी पवार,स्वप्नील नरबाग ,राहुल गायकवाड बबीताताई पोटफोडे आदींची उपस्थिती होती.
"नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेचे हित कोणत्याच राजकीय पक्षाने केले नाही.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी समाज कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली एक होऊ शकला नाही .परिणामी आंबेडकरी जनता व मतदार आजही सत्तेपासून वंचीत आहे .नांदेड जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे .त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जनतेला ,कार्यकर्त्यांना एकत्र करून एक झेंड्याखाली आणण्यासाठी प्रजासत्ताक पार्टीची आपण स्थापणा करीत आहोत "
-सुरेशदादा गायकवाड
No comments:
Post a Comment