शौचालय अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकांना निलंबित करा: उपसरपंचाची मागणी.
किनवट,दि.८: स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालयाचे बांधकाम न करता लाभधारकांच्या खोट्या सह्या व अंगठे घेऊन ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून पैशांची उचल केली व अपहार केला ,असा आरोप चिखली(बु.ता.किनवट) चे उपसरपंच शेख अमन शेख ईसा, कल्पना भीमराव पाटील अश्विनी ज्ञानेश्वर माने, रजियाबी शेख महेबुब (सर्व ग्राम पंचायत सदस्य) यांच्यासह पांडुरंग लांडगेवार ,अंबादास मेश्राम, लतीफाबी शेख रमजान, शत्रुघ्न तुमराम सारजाबाई तुमराम यांनी निवेदनाद्वारे आज (ता.८) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चिखली बु. येथील शौचालय लाभधारकांच्या खोट्या सह्या व अंगठे करून सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून रकमेची उचल करून भ्रष्टाचार केला आहे.या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करून चौकशी करावी व भ्रष्टाचाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment