NRC, NPRC & CCAआंदोलनास माजी आमदार प्रदीप नाईक यांची भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 February 2020

NRC, NPRC & CCAआंदोलनास माजी आमदार प्रदीप नाईक यांची भेट



NRC, NPRC & CCAआंदोलनास माजी आमदार प्रदीप नाईक यांची भेट

किनवट : एन.आर.सी.एन.पी.आर.सी.ए.ए.च्या विरोधात  दि.२५जानेवारी पासून तालुक्यातील विविध राजकीय तसेच सामाजिक पक्ष व विविध संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर "शाहीन बाग" नावाने साखळी धरणे आंदोलन सुरू आहे.
       जोपर्यंत हा काळा कायदा केंद्र सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनास विविध पक्षाच्या नेत्यांनी तसेच सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व पाठिंबा दिला आहे.
केंद्र सरकारने सध्या देशात सी.ए. कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या कायद्यामुळे मुस्लिम समाजा सहित अन्य समाजातील सुमारे ५०% नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेतल्या जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे या कायद्याच्या विरोधात देशभरात विविध ठिकाणी मोर्चे आंदोलने तसेच धरणे आंदोलने करून नागरिक संताप व्यक्त करू लागले आहे.हा कायदा धर्माच्या आधारावर असल्यामुळे हा कायदा केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी दि.२४ जानेवारी पासून विविध राजकीय,सामाजिक तसेच संविधान प्रेमी नागरिकांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर "शाहीन बाग" नावाने साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात वेगवेगळ्या जाती समुदायातील नागरिक सहभाग नोंदवत आहे.दरम्यान, या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक,एम.आय.एम चे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन,मुफ्ती जुनेद,मुफ्ती तनवीर,माजी नगराध्यक्ष हाजी इसा खान,माजी नगराध्यक्ष निसार खान,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार  ,माजी नगराध्यक्ष के.मूर्ती,काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर,कॉ.अर्जुन आडे,प्रकाश गब्बा राठोड,प्रवीण म्याकलवार , दिनकर दहिफळे,शे. सलीम,कॉ.गंगारेड्डी,कॉ.जनार्दन काळे,एड.सुभाष ताजने,दीपक ओंकार,राजेंद्र शेळके,नगरसेवक साजिद खान,इम्रान खान,राहुल नाईक,कचरू जोशी,आदींनी भेटी देऊन या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.तसेच धर्मावर आधारलेला कायदा रद्द करण्याची मागणी केली.
    दिल्ली येथील "शाहीन बागच्या" धरतीवर  येथील "शाहीन बाग"अर्थात साखळी धरणे आंदोलनाला विविध स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.मुस्लिम बांधव हे "रोजा" उपवास करून देशामध्ये अमन शांती राहण्या साठी प्रार्थना करत आहे. आंदोलनस्थळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा लावण्यात आलेली आहे.सहभागी आंदोलक हे देशभक्तीवर गीते गाऊन दररोज होणाऱ्या सभेच्या समारोप हा राष्ट्रगीताने करत असल्यामुळे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment

Pages