रोहिदासतांडा शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 February 2020

रोहिदासतांडा शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी
रोहिदासतांडा शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी

किनवट :
"तंबाखू, विडी, सिगारेटला नका पडू बळी, नाहीतर होईल जीवनाची होळी" ,"तंबाखू सोडा जीवन जोडा", "तंबाखूची कमी जीवनाची हमी", अशा लक्षवेधक घोषणांसह रोहिदासतांडा, केंद्र कमठाला (ता.किनवट) येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच फेरी काढून गावकर्यांचे लक्ष वेधले.
        जागतिक कर्करोगदिनाचे औचित्य साधून शाळेत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत पेटवण्यात आली. तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखूजन्य पदार्थ  सेवनाची  भयानकता याविषयी राज्यपुरस्कारप्राप्त शिक्षिका शालिनी सेलूकर यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. शाळेतील विद्यार्थी व पालकांना तंबाखूमुक्तिसाठी संकल्प शपथ शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे यांनी दिली.
        जागतिक कर्करोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांना व्यसनमुक्तिसाठी पत्रे लिहिली. या वेळी अंगणवाडीताई कविता चव्हाण, उपसरपंच नामदेव चव्हाण, किसन चव्हाण, मधुकर चव्हाण, सुरेश राठोड हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages