प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नागपूर येथे रमाई महोत्सव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 4 February 2020

प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नागपूर येथे रमाई महोत्सव

प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नागपूर येथे रमाई महोत्सव

प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्धेशिय संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात सावली  म्हणून राहिलेल्या रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दोन दिवसीय महोत्सवाचे नागपूरातील भगवान नगर मैदानावर आयोजन करण्यात आले आहे 7 ते 8 फेबुरवरी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात महापुरुषांची विचारधारा व वारसा      
प्रबोधनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
      या महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील दरी दूर करण्यासाठी विषेश प्रबोधनही करण्यात येणार आहे. अशी माहिती अनिकेत कुत्तरमारे यांनी दिली आहे.
यंदा हे सहावे वर्ष आहे .
7 फेबुरवरी ला महोत्सवाचे उदघाटन सायंकाळी सहा वाजता  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ,दिक्षाभूमी चे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई
यांच्या हस्ते होणार आहे .या प्रसंगी प्रमुख पाहुने सीईओ प्रफुल शेंडे ,समाजकल्याण आयुक्त सिद्धार्थ गायकवाड ,यशोधरा नगर चे पोलीस निरीक्षक दीपक साखरे ,अजनी ट्राफिक नागपूर चे पोलीस निरीक्षक  चाक्षुपल बहादुरे ,हुडकेश्वर चे पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे , वेतन व भविष्य निधी माध्यमिक चे अधीक्षक रवींद्र पाटील, संचालक दयासागर  वानखेडे, सेंट पॉली स्कुल चे राजाभाऊ टाकसाळे ,राऊत इमिटेशन प्रशांत राऊत आदी उपस्थित राहतील.सायं 6ते10 पर्यंत रमाई च्या जीवनावर  स्वागत नृत्य सादरीकरण तसेच सुप्रसिद्ध सप्त खंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे .
       दुसऱ्या दिवशी आठ फेबुरवारी रोजी सेरा मिनीप्लेक्स  ,मनिषनगर
येथे कॉपी हा चित्रपट दुपारी 3 वाजता दाखविला जाईल .

No comments:

Post a Comment

Pages