शंकरनगर येथील प्रकरणात भास्कर राव पाटील खतगावकर सह दोषींवर गुन्हे नोंद न करण्यास सोमनाथ शिंदे यांचा हलगर्जीपणा: समितीचा अंतिम अहवाल------!
नांदेड : शंकर नगर येथील श्री साईबाबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील एका दलित मुलीचे लैंगिक शोषण झाले. या लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी विलंब झाला, कारण पीडित मुलगी व तिची आई दलित, गरीब, अशिक्षित, निराधार असल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात प्रस्थापित जातीचे शिक्षक, पोलीस प्रशासन व राजकीय व्यक्तींनी दबाव आणला. या प्रकरणाची सत्यता उघड करण्यासाठी नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट व फुले शाहू आंबेडकर युवामंच यांनी 22 जानेवारी 2020 रोजी Factual Committee Against Sexual Harassment of child, Victim Shankarnagar, Nanded ही समिती गठित केली होती.
या समितीने दि. 23 जानेवारी 2020 पासून ते 31 जानेवारी 2020 पर्यंत संबंधित प्रकरणाचे व प्रकरणातील संबंधित पीडितेचे नातेवाईक, शाळा प्रशासन डॉक्टर व पोलीस प्रशासन तसेच समितीस योग्य माहिती पुरवणाऱ्या सूत्रांकडून माहिती संकलित करुन दिली.३ रोजी समितीने आपला अंतिम अहवाल पत्रकारा परिषदत सादर केला.
या अहवालामध्ये सविस्तर घटनाक्रम आणला असून आम्ही संकलित केलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही इयत्ता सहावी या वर्गात होती. तिच्या वडिलांचे निधन होऊन 6 वर्ष झाले आहे. तिची आई रोज मजुरी करून तिचे पालन पोषण करत आहे. पीडित मुलीचे लैंगिक शोषण दयानंद राजुरे यांनी अश्लील व्हिडिओ दाखवून प्रथमत केले आहे. त्यानंतर 13 डिसेंबर 2012 रोजी सय्यद रुसूल याने तिचे लैंगिक शोषण व दुष्कर्म केले आहे. याबाबत मुलीने तिच्या आईला सांगितले असता. दि. 14 डिसेंबर रोजी पीडित मुलीची आई प्रदीप जाधव पाटील यांना तक्रार सांगितली असता, त्यांनी या अशिक्षित महिलेला तक्रार करण्यास सांगितले. त्यावर ती महिला घरी आली व तक्रार देण्याच्या तयारी चालू असताना, दि. 16 डिसेंबर 2019 रोजी सय्यद रसुल व दयानंद राजुरे हे सुरेखा बनसोडे यांच्या घरी येऊन तिच्या आईला बोलावून घेतले व धमकी दिली. अशिक्षित व गरीब निराधार या महिलेने प्रस्थापितांविरोधात लढण्याची ताकद नसल्याने तसेच आपल्या कौटुंबिक प्रतिष्ठेचा विचार करून तक्रार दिली नाही. त्यानंतर 18 डिसेंबर 2020 रोजी मुलीला तिच्या आईने उपचार चालू केला हा उपचार अद्याप चालूच आहे, पण दिनांक 18 डिसेंबर 2019 पासून 14 जानेवारीपर्यंत पिडीतेचा उपचार योग्य झाला नाही, तसेच पिडीतेला होणारा आर्थिक खर्च हा सय्यद रसूल, दयानंद राजुरे प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके व भास्करराव पाटील खतगावकर यांनी केला आहे. एक लाख 22 हजार रूपये पर्यंत आहे, तसेच इतरत्र दाखवण्यासाठी यांनी पीडित मुलीच्या आईला हे आर्थिक सहाय्य प्रकरण दडपण्यासाठी केले आहे. पीडितेच्या आईने 17 जानेवारी 2020 नांदेड ‘क्रिटिकल केअर हॉस्पिटल’ मधून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे ‘एपीआय सोमनाथ शिंदे’ यांना तक्रार दिली, तक्रार देण्यास विलंबाचे कारण हे पीडित महिलेवर दलित म्हणून आणलेला दबाव होता, हे नाकारता येत नाही. या अहवालामध्ये घटनाक्रम सविस्तर मांडला आहे. या घटनाक्रमाची पडताळणी केली आहे, समितीने आपल्या अंतिम अहवालामध्ये शिक्षक सय्यद रसुल यांनी 13 डिसेंबर रोजी पीडित मुलीचे लैंगिक शोषण व दुष्कर्म केले आहे. तसेच पीडित मुलगी ही मातंग जातीची होती म्हणूनच केले आहे. दुसरा दोषारोप शिक्षक दयानंद राजुरे यांच्यावर करत असून, पीडित मुलगी मातंग जातीची होती म्हणूनच लैंगिक शोषण करण्यासाठी तिची निवड केली. तसेच तिला अश्लील व्हिडीओ दाखवून या व्हिडिओ बाबत प्रश्न विचारले व तिचा विनयभंग केला. तसेच प्रदीप जाधव यांनी पीडित मुलीच्या आईने तोंडी तक्रार केल्यानंतर ही मुख्याध्यापकांनी बेजबाबदार पणे वागत केवळ ही महिला मातंग जातीची असल्यामुळे त्यांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही. तसेच सातत्याने हा प्रयत्न केला की, हे प्रकरण दडपले पाहिजे. तसेच आईवर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणला. समितीने चौथा आरोप धनंजय शेळके यांच्यावर ठेवला आहे. प्राचार्य धनंजय शेळके यांनी पीडित महिलेची आई ही मातंग जातीची असल्यामुळे आपल्या जातीय अहंकाराने शेळके यांनी राजकीय व प्रशासकीय दबाव या दलित महिलेवर आणला व तसेच तेरा वर्षाच्या पीडितेवर लैंगिक शोषण झाले, ही घटना जातीय मानसिकतेतून झाली हे लपवले. तसेच भास्करराव पाटील खतगावकर यांना पीडित तेरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे हे माहित झाल्यानंतरही पोलिसात तक्रार दिली नाही, तसेच आपल्या जातीय मानसिकतेतून निराधार, अशिक्षित, मातंग महिलेस धमकावले व हे प्रकरण दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला. समितीच्या निदर्षनास सुरेखा बनसोडे ही सुद्धा आरोपी आहेत असे लक्षात आले आहे.
Wednesday 5 February 2020
Home
जिल्हा
शंकरनगर येथील प्रकरणात भास्कर राव पाटील खतगावकर सह दोषींवर गुन्हे नोंद न करण्यास सोमनाथ शिंदे यांचा हलगर्जीपणा: समितीचा अंतिम अहवाल------!
शंकरनगर येथील प्रकरणात भास्कर राव पाटील खतगावकर सह दोषींवर गुन्हे नोंद न करण्यास सोमनाथ शिंदे यांचा हलगर्जीपणा: समितीचा अंतिम अहवाल------!
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment