नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील संयुक्त संघर्ष समितीच्या राष्ट्रीय समन्वयकपदी भरत शेळके यांची नियुक्ती. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 5 February 2020

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील संयुक्त संघर्ष समितीच्या राष्ट्रीय समन्वयकपदी भरत शेळके यांची नियुक्ती.







नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील संयुक्त संघर्ष समितीच्या राष्ट्रीय समन्वयकपदी  भरत शेळके यांची नियुक्ती.






नवी दिल्ली :  'सीएए','एनआरसी' व 'एनपीआर'  च्या विरोधात देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आणि अल्पसंख्यांक समुदायाचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली येथे जॉइंट एक्शन कमिटी ची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत "सेक्युलर मूव्हमेंट" च्या वतीने महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष तथा ठाण्याचे निवृत पोलिस उपायुक्त (राष्ट्रपती पदक प्राप्त)भरत शेळके यांनी प्रतिनिधीत्व केले. 
       या बैठकीत भारतातील ख्रिश्चन, मुस्लिम बौद्ध आणि इतर अल्पसंख्यांक समुदायाकडून राष्ट्रीय समन्वयक म्हणून भरत शेळके यांना जबाबदारी देण्यात येऊन त्यांची कायदेविषयक सल्लागार समितीवरही नेमणूक करण्यात आली आहे. 
    या जबाबदारीचा एक भाग म्हणून भारतातील प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरूंच्या मागणीनुसार त्यांच्या शिष्टमंडळाची भेट भरत शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर  घडवून आणली. या चर्चेमध्ये राष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकत्व कायद्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने विरोध करण्याची मागणी करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणांमध्ये आणि भीमा कोरेगाव प्रकरणी झालेल्या अंदोलनामध्ये अनेक आंबेडकरी तरुणांना अटक करण्यात आली होती. त्या केसेस मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे.































No comments:

Post a Comment

Pages