आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं 'कोरोना पॅकेज' जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 March 2020

आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं 'कोरोना पॅकेज' जाहीर

आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं 'कोरोना पॅकेज' जाहीर
नवि दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पुढील तीन महिने गरिबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

 जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं ‘कोरोना पॅकेज’ जाहीर

निर्मला सीतारमन यांच्या घोषणा

1. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
3. देशात कोणही उपाशी राहणार नाही
4. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
5. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
6. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत
7. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
8. आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार
9. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार
10. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
11. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा

महत्त्वाचे मुद्दे वाचा विस्ताराने (Corona Package by Modi Government)

-मातृशक्ती, महिला ज्यांचं जनधन खातं आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रुपये

– वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त एक हजार रुपये – तीन कोटी विधवा, वृद्ध, दिव्यांगाना लाभ, डायरेक्ट खात्यात मिळणार.

– मनरेगा माध्यमातून काम करणाऱ्यांची रोजंदारी 182 वरुन 202 रुपयांपर्यंत वाढवली

-130 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये भरणार, देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील

-पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता. जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल

-वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी यासारख्या योद्ध्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा

-कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरजूंना लाभ

लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये याची काळजी घेऊ, अर्थमंत्री निर्मला सीतारमण सीतारम

No comments:

Post a Comment

Pages