बुद्धप्रिय कबीर यांचे निधन.
औरंगाबादः फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेशी उभे जीवन समर्पित केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर उर्फ संजय अर्जुनराव उबाळे यांचे आज, बुधवारी दुपारी साडेचार वाजता निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.
बुद्धप्रिय कबीर यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतःचे जीवन झोकून देऊन काम काम केले. एक सच्चा आणि हाडाचा कार्यकर्ता म्हणून बुद्धप्रिय कबीर यांची ओळख होती. पायाला भिंगरी बांधल्यागत ते परिवर्तनवादी चळवळीसाठी आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत झटत राहिले. दिलदार मनाचा सच्चा मित्र अशीही त्यांची ख्याती होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. विद्यार्थीदशेपासूनच आक्रमक कार्यकर्ते असलेले बुद्धप्रिय कबीर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर व संशोधन विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सदस्य होते. बुध्दप्रिय कबीर यांनी आयुष्यभर अविवाहित राहून आंबेडकरी चळवळ, वंचित समाजासाठी जीवन समर्पित केले. त्यांच्या पश्चात आई, आजी, बहिण, वहिणी व शेकडो सहकारी असा परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Wednesday 25 March 2020
बुद्धप्रिय कबीर यांचे निधन.
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment