सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गैरहजर दोन डॉक्टर्सवर कारवाईचे ; तर बिनधास्त फिरणाऱ्या दोन होमकोरोन्टाईंना ताब्यात घेऊन कॉरंटाईन वार्डमध्ये ठेवण्याचे दिले आदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 25 March 2020

सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गैरहजर दोन डॉक्टर्सवर कारवाईचे ; तर बिनधास्त फिरणाऱ्या दोन होमकोरोन्टाईंना ताब्यात घेऊन कॉरंटाईन वार्डमध्ये ठेवण्याचे दिले आदेश

सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गैरहजर दोन डॉक्टर्सवर कारवाईचे ; तर बिनधास्त फिरणाऱ्या दोन होमकोरोन्टाईंना ताब्यात घेऊन कॉरंटाईन वार्डमध्ये ठेवण्याचे दिले आदेश

किनवट : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी होमकोरोंटाईन शिक्का मारलेला असतांना बिनधास्त फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना आता कॉरंटाईन वार्डमध्ये ठेवण्याचे व  बोधडी ( बुद्रूक ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन अनुपस्थित डाक्टर्सवर सक्त कारवाई करण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
             कोरोना विषाणू ( कोव्हीड- १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. होम   कॉरंटाईन शिक्का मारलेल्यांनी रवतःच्या घराबाहेर पडू नये. सदरील आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.असे सक्तपणे सांगितले आहे. असे असतांना सुध्दा बोधडी ( बुद्रूक ) येथील दोघे घरी न राहता बेफिकीर फिरत असल्याचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे पथक बोधडी ( बुद्रूक ) येथे पाहणीस गेले असता आढळून आले. तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन तहसील इमारतीत कोरोन्टाईन वार्डमध्ये ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ज्यांना होमकोरोन्टाईन केले आहे त्यांनी आपल्या घराच्या बाहेर पडू नये अन्यथा त्यांचेवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
             त्यानंतर त्यांनी बोधडी ( बुद्रूक ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी येथील दोन वैद्यकीय अधिकारी डॉ. भंगे व डॉ. दस्तगीर हे अनाधिकृत गैरहजर आढळून आले. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू असतांना गैरहजर राहणाऱ्या या डॉक्टर्सवर सक्त कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
             या पाहणी दौऱ्या प्रसंगी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे समवेत उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार नरेंद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व सहायक पोलिस निरिक्षक गणेश पवार आदीजन होते.

No comments:

Post a Comment

Pages