कोरोना विषाणूंच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी घेणेसाठी रविवारचा आठवडी बाजार बंद
किनवट : राज्यामध्ये कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना च्या अनुषंगाने. येत्या रविवारी (ता.२२)भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे,याची सर्व नागरिक,व्यापारी,शेतकरी व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश शेट्टी सुंकेवार, अध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार व आरोग्य सभापती कैलास भगत यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी खालिल बाबिंचे पालन करावे ; यात साबन व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवावेत,शिकताना व खोकलतांना आपल्या तोंडावर रुमाल धरावे,सर्दि,खोकला व श्र्वसनाचा त्रास जानवल्यास तात्काळ नजिकचा संपर्क टाळा, मास व अंडी पुर्णपणे शिजवून व उकळून घ्यावे,गर्दिच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकु नये व पाळीव प्राण्यांसोबत थेट संपर्क टाळावा.
कोरोना आजाराचे लक्षणे आढळून आल्यास तात्काळ शासकिय रुग्णालयाशी संपर्क साधावा.
संपर्काकरिता राष्ट्रीय काॅल सेंटर +९१११२३९७८००४६, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष - ०२० - २६१२७३९४ व टोल फ्रि हेल्पलाईन नंबर १०४ वर संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून यापूर्वीच शहरातील महाविद्यालये,शाळा, कोचिंग क्लासेस,प्रमुख स्थापना बंद ठेवण्यात आले आहेत.तसेच मंगल कार्यालये, समाज मंदिर येथिल सार्वजनिक कार्यक्रम तसेच शहरात पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमवू नयेत,असे निर्देश देण्यात आलेले आहेत,असेही नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Friday, 20 March 2020

कोरोना विषाणूंच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी घेण्सायाठी रविवारचा आठवडी बाजार बंद
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment