प्रासंगिक
'आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करु, तुम्ही आमच्यासाठी घरी थांबा!'
-डॉक्टरांकडून सर्वांना एक कळकळीचे आवाहन
सर्वांपासून वेगळे व्हा! तुम्ही, मी, आपण... सध्या जिवंत आहोत ही आपल्या आयुष्यातील याक्षणीची सर्वात मोठी गोष्ट आहे. जगभरात आत्तापर्यंत आठ हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत...जे कोरोनामुळे मेले त्यांच्या नातेवाईकांना विचारा की, अकस्मात मृत्यू काय असतो!
आपण अजूनही जिवंत आहोत.
सर्वजण जगतील... फक्त वेगळे व्हा!
आज तुम्ही कोण आहात याला शुन्य महत्त्व आहे. तुमची नोकरी, शिक्षण, हुद्दा, पगार, काम, प्रवास, कला, जात धर्म... आज कवडीमोल आहे कारण हा कोरोना वायरस फरक पहात नाही.... स्त्री-पुरुष सुद्धा नाही! त्याला फक्त मानवी शरीर पाहिजे! त्याच्याशी लढण्याचा एकमेव सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे वेगळे होणं! एकीचे बळ वगैरे आज आपला सर्वात कमकुवत मुद्दा आहे. ज्याला जिवंत राहायचंय त्याने स्वत:ला वेगळं करावं. आपला जीव वाचला तरच आपण दुसऱ्याला वाचवू शकतो!
अजूनही लोक बिनधास्त अज्ञानात जगत आहेत... मुंबईतील गेट वे, पुण्यातील तुळशीबाग, नागपुरातील सीताबर्डी, औरंगाबादेतील औरंगपुरा... भरपूर गर्दी आहे! लोक अजूनही शासनाच्या सुचना टाळून आपले काम करत आहेत. तुम्हीही मराल आणि सोबत कमीत कमी दहा लोकांना सोबत घेऊन मराल!
वयक्तिक सांगायचं तर जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यातील अजूनतरी एकही झोपडपट्टीतील किंवा गल्लीतील पेशंट नाही. एकतर ते परदेशातून आलेले आहेत किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत(कॅब ड्रायव्हर). सव्वाशे कोटी भारतीय ही आपली याक्षणी सर्वात मोठी कमकुवत बाजू बनली आहे कारण हा विषाणू जर भारतातील एकाही झोपडपट्टीत किंवा गल्ली, मोहल्ल्यात घुसला तर प्रत्येक माणूस एका 'बॉम्ब' सारखा असेल, 'मानवी बॉम्ब'! आपल्यामुळे कोणीतरी मरेल लक्षात ठेवा! मॉरटॅलिटी रेट (मृत्यूदर) जरी खूप कमी असला तरी एक गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही की, आपल्याकडे संसाधने खूप कमी आहेत. रूग्णांचा आकडा अचानक जर वाढला तर व्यवस्था कोलमडून जाईल. वेळीच उपाययोजना नाही केली तर अराजकता माजेल! होणाऱ्या नुकसानीची कोणी कल्पनाही करू शकणार नाही.
काही क्षणांसाठी धर्म जात बाजूला ठेवून विचार करू की साधारणपणे आपण रामाला मानतो ना? त्याने १४ वर्षे स्वत:ला जगापासून वेगळे केले होते हे ही मान्य आहे ना... मग फक्त १४ दिवस स्वत:ला वेगळे करायला काय हरकत आहे? मान्य आहे की तुमचा बायकोवर जीव आहे, तुमच्या गोड मुलीवर तुमचं जीवापाड प्रेम आहे... पण तुमच्या हातांवर, तुमच्या गालांवर, तुम्ही वापरत असलेल्या रूमाल आणि मोबाईलवर तो 'कोरोना वायरस' नसेल कशावरून? तुम्ही पॉझिटिव्ह नाहीत हे कशावरून? आपल्या जीवलगांचे प्राण का धोक्यात घालताय? हे वेगळेपण फक्त बाहेरच्या लोकांशी नको...तर संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी असावे. होईल तेवढं अंतर ठेवा! त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ नका.🙏🏼
स्वत:ला पुर्णपणे वेगळे करा. जर प्रत्येकाने स्वत:ला १४ दिवस पुर्णपणे अलिप्त ठेवले तर हा न दिसणारा सुक्ष्मजीव आपल्या समोर पुन्हा उद्भवनार नाही नाहीतर आपण कोणाला दिसणार नाही! लोकसंख्या हा आपला कमकुवत मुद्दा आहे.
महाराष्ट्रात मंदिरांनी आपले दरवाजे बंद केले आहेत... प्रत्येकजण आपापले इगो काही काळासाठी घराबाहेर चपलांच्या बाजूला काढून ठेवू... दुकाने बंद, कितीही महत्वाचा असेल तरी प्रवास बंद, एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क पुर्णपणे बंद, अंगदुखी-पाठदुखी-जुनाट आजार असल्या OPD रूग्नांणी दवाखान्यात जाणे बंद.
जगणे वेगळे आणि जिवंत राहाणे वेगळे! आज जिवंत राहणे महत्त्वाचे आहे...
तुम्ही घरून काम करा, घरून काम होत नसेल तरीही घरीच राहा, उपाशी राहा... फक्त वेगळे व्हा... !
तुम्हाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आमची!
Friday, 20 March 2020

Home
प्रासंगिक लेख
'आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करु, तुम्ही आमच्यासाठी घरी थांबा!' -डॉक्टरांकडून सर्वांना एक कळकळीचे आवाहन
'आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करु, तुम्ही आमच्यासाठी घरी थांबा!' -डॉक्टरांकडून सर्वांना एक कळकळीचे आवाहन
Tags
# प्रासंगिक लेख
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment