कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे-डॉ अशोक बेलखोडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 March 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे-डॉ अशोक बेलखोडे


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे





किनवट : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रत्येकाने “जबाबदारीने” वागणे आवश्यक, गरजेचे व अपरीहार्य आहे. संपुर्ण जगभर या आजाराने थैमान घातले असतांना त्याचा धैर्याने संघटीतपणे मुकाबला करणे एवढेच आपल्या हातात आहे आपण ते करावे, असे  आवाहन साने गुरुजी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक व मराठवाडा विकास मंडळ, औरंगाबादच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी आज(.२०) केले आहे.
     येथील प्रशासनाने “करोना” संदर्भात खूप चांगली खबरदारी घेतली आहे. अगदी सतर्कतेने शासनाच्या सूचना अंमलात आणून ते काम करीत आहे. आरोग्य विभागही तेवढ्याच तत्परतेने काम करीत आहे. करोनाला सामना देण्यासाठी सज्ज झालाय. ह्या दोन्ही विभागाचे जनतेनी कौतुक करायला हवे. शाबासकीही द्यायला हवी व सहकार्यही करायला हवे,असे डाॅ.बेलखोडे यांनी म्हटले आहे.
   कोणत्याही चुकीच्या पोस्ट, अफवा, फॉरवर्ड करू नये. पसरवू नयेत. स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी वगैरे इत्यादी सूचना सर्व शहाणी माणसे व प्रशासन सांगतच आहेत. तरी पण अत्यंत चुकीच्या गोष्टी चुकीच्या पध्दतीने पसरत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य भीतीचे वातावरण तयार होत आहे, संबंधीतांना मनस्ताप होत आहे व प्रशासनाचे काम वाढते आहे,असेही डाॅ.बेलखोडे म्हणाले
   तालुका प्रशासनातील अभिनव गोयल, सहायक जिल्हाधिकारी, नरेंद्र देशमुख, तहसीलदार व मारोती थोरात पोलिस निरीक्षक या सर्वांचे सहकार्य तसेच आरोग्य खात्यातील डॉ. उत्तम धुमाळे, डॉ. संजय मुरमुरे व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचे कौतुक करणे गरजेचे असल्याचे डाॅ.बेलखोडे यांचे मत आहे.

No comments:

Post a Comment

Pages