खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 March 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबीर संपन्न

खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबीर संपन्न
नांदेड : कोरोनाच्या प्रादुर्भावाने आज संपूर्ण जग हादरले आहे,कोरोनाच्या विळख्यातून देशाला वाचवण्यासाठी शासनाने यावर खबरदारी म्हणून देशभरात संचारबंदी तसेच लॉकडाऊन केले.संचारबंदीमुळे कुठेही रक्तदान शिबीर होतं नाहीयेत. परंतु, आज घडीला रक्ताचा खूप मोठा तुटवडा भासत आहे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत  हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या *तुकाई* निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


   सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत  अनेकांनी  रक्तदान केले. यावेळी खासदार हेमंत पाटील, राजश्री पाटील,प्रसाद पाटील ,रुद्रा उर्फ राणा पाटील,डॉ. सोमेश्वर पतंगे,दीपक कल्याणकर,ऍड. रवींद्र रगटे,अविनाश कुटे,सोमेश संगेवार,नितीन पाटील,शुभम स्वामी,श्याम पाटील वानखेडे,धनंजय पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages