CAA,NPR हे भारतीयांसाठी घातक -प्रा.जावेद शेख - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 March 2020

CAA,NPR हे भारतीयांसाठी घातक -प्रा.जावेद शेख

CAA,NPR हे भारतीयांसाठी घातक -प्रा.जावेद शेख



चंद्रपूर : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष प्रणित रिपब्लिकन स्टूडंट्स फेडरेशन (इंडिया),चंद्रपूरच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ CAA, NPR, NRC विरोधात परिसंवादाचे आयोजन रिपब्लिकन नेते प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या नेतृत्वात नुकतेच करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी युवा कार्यकर्ते  प्रतीक डोरलीकर हे होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी सर्व समाजातील घटकांना एकत्रयेऊन भारतीय संविधानाला संरक्षण करण्याचे आव्हान केले.
    CAA, NRP भारत सरकारने त्वरित रद्द करावे आणि ओबीसी घटकांची स्वतंत्र जनगणना करावी यासाठी पाठपुरावा करणार  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . तसेच  संविधान बचाव-नागरिकता बचाव-देश बचाव अभियान संपूर्ण विदर्भात राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.
   प्रमुख वक्ते प्रा.जावेद शेख यांनी CAA, NRC च्या विविध बारीक बाबीवर प्रकाश टाकला. विविध स्तरावरील आकडेवारीच्या अनुषंगाने हे ऍक्ट कसे भारतीयांसाठी घातक आहे, हे उपस्थितांना पटवून दिले.मुंबई वरून आलेले अनिरुद्ध महाजन यांनी भारताचा कणा जो संविधान आहे त्याला गालबोटं लावण्याचे कार्य सरकार तर्फे करण्यात येत आहे, असे प्रतिपादित केले.
   या वेळी सौरभ दत्ता, पुणे, झेबा खान,नागपूर, लुम्बीनी गणवीर, पुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजस प्रवीण खोब्रागडे यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला.  जागतिक महिला दिन असल्यामुळे चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला . प्रास्ताविक संघपक सरकाटे,संचालन सुरभी मोडक, आभार लीना राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हर्षल खोब्रागडे,प्रजोत बोरकर,कपिल गणवीर,शुभम शेंडे,सक्षम पाथरडे, सुबोध टेम्बरे, यश उमरे,अक्षय डांगे,सेजल घायवण,जननी चांदेकर,साहिल जुनघरे,अविनाश आमटे,अभिजित तोतडे,रणजित उके,श्रावस्ती तावाडे,रणजिता गजरे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages