मास्क आणि सॅनिटायजरवरून ग्राहकांची लुट ,होणार सात वर्षे कारावासाची शिक्षा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 March 2020

मास्क आणि सॅनिटायजरवरून ग्राहकांची लुट ,होणार सात वर्षे कारावासाची शिक्षा

मास्क आणि सॅनिटायजरवरुन ग्राहकांची लुट, होणार सात वर्ष कारावासाची शिक्षा



नवी दिल्लीः कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळ्या माध्यामातून जागृती केली जात आहे. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळेच लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायजर आणि मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात करतायं. मास्क आणि सॅनिटायजरची मागणी वाढल्याने या वस्तुंचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शिवाय ज्या मेडिकलमध्ये साठा आहे, तेथे अवाजवी पैसे आकारुन ग्राहकांची लूट सुरु आहे. यावर आता कंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. या अत्यावश्यक वस्तुंची विक्री वाढीव किंमतीत करणा-या मेडिकल धारकांना आता चांगलाच चाप बसणार आहे.

  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात प्रत्येक जण या जीवघेण्या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करताना दिसत आहे.
मास्क आणि सॅनिटायजरची मागणी वाढली आहे. मोदी सरकारने यासंबंधित महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने या दोन्ही वस्तु 'अत्यावश्यक वस्तू' म्हणून घोषित केल्या आहेत. मास्क आणि सॅनिटायजरला अत्यावश्यक वस्तू घोषित करणे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडे याचे उत्पादन, गुणवत्ता आणि विक्रीचे अधिकार झाले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मास्क आणि सॅनिटायजरीची विक्री एमआरपी दरानुसारच करण्यात यावे, यावरही सरकारची करडी नजर असणार आहे.

होईल सात वर्ष कारावास
30 जून 2020 पर्यंत मास्क आणि सॅनिटायजर या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांना सात वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. तसेच दंडही वसूल करण्यात येईल. या निर्णयाने सॅनिटायजर आणि मास्कचा काळाबाजार रोखता येईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजार होत असल्याने ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. जेणेकरुन अशा मेडिकल धारकांना चांगलाच चाप बसेल. मास्क आणि सॅनिटायजरची विक्री अवाजवी पैशांनी करत असल्याचे आढळल्यास ग्राहकांनी 1800-100-400 या हेल्पाईलन क्रमांकवर कॉल करुन तक्रारी करावी. तसेच ग्राहक ऑनलाईन पद्धतीने देखील तक्रारी नोंदवू शकतात. यासाठी राष्ट्रिय ग्राहक हेल्पलाईन (National consumer helpline) च्या वेबासाईटवरही तुम्ही तक्रार करु शकता,

No comments:

Post a Comment

Pages