डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 March 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध इमारतींच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून येत्या तीस दिवसांच्या आत अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, नॅकच्या अनुषंगाने केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी गठित करण्यात आलेल्या समितीने कुलगुरुंच्या विरोधात 16 दोषारोप केले आहेत. मात्र तत्कालीन कुलगुरु हे निवृत्त झाले असल्याने विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागवून कारवाई करण्यात येईल


आवश्यकता असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सदस्य विक्रम काळे, हेमंत टकले, ॲड. निरंजन डावखरे आदींनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

No comments:

Post a Comment

Pages