वाल्मिकी समाजातील मुलांना अधिकारी बनविण्याची जबाबदारी आंबेडकरवादी मिशन घेईल-दीपक कदम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 March 2020

वाल्मिकी समाजातील मुलांना अधिकारी बनविण्याची जबाबदारी आंबेडकरवादी मिशन घेईल-दीपक कदम

वाल्मिकी समाजातील मुलांना अधिकारी बनविण्याची जबाबदारी आंबेडकरवादी मिशन घेईल -दीपक कदम


नांदेड : संपूर्ण महाराष्ट्रातील वाल्मिकी समाजाच्या मुलांना आधिकारी घडविण्यासाठी आंबेडकरवादी मिशनमध्ये निशुल्क प्रवेश दिल्या जाईल.याचा लाभ वाल्मिकी समाजातील पदवीधर तरुणांनी घ्यावा. परंपरागत व्यवसाय सोडून द्यावा व शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन आंबेडकरवादी मिशन चे दीपक कदम यांनी केले.
   आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यानिमित्ताने  आंबेडकररवादी  मिशन मध्ये मजूर ते उच्चशिक्षित  महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला .या प्रसंगी हजारो महिलांच्या प्रचंड प्रीतिसादात हा मेळावा सम्पन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी आंतरजातीय विवाह करून आदर्श समोर ठेवण्यात आला.बौद्ध समाजातील सचिन सोनकांबळे(पोलीस उपनिरीक्षक)व मातंग समाजातील पूजा डोंपल्ले यांचा आंतरजातीय विवाह मिशन केंद्रात भन्ते पय्याबोधी व शांतिदुत प्रतिष्ठानचे डी  पी. गायकवाड यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला. हुंडा व किंव्हा पारंपरिक पद्धतीला छेद देऊन अत्यंत सध्या पद्धतीने हा विवाह हजारो उपस्थितांच्या साक्षीने सम्पन्न झाला.
            या प्रसंगी आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने न्यायाधीश श्वेता चव्हाण,अनुपमा जोंधळे,सुचित्रा रामराव भगत(महिला दक्षता प्रमुख), अश्विनी सोनसळे(विकास अधिकारी),इंजि.सविता पडघने ,इंजि सोनकांबळे,करूनताई तारू,दैवशीला गवंदे(रमाई प्रतिष्ठान औरंगाबाद ),छायाताई कांबळे,मिताली वाघमारे,प्रा. डॉ.रेखा वाडेकर,डॉ.स्नेहा तारू,शिल्पा जिंतूरकर,मयुरी नाईक,कांचन गायकवाड,करूना व्यवहारे,प्रा.डॉ. जयश्री भावे,डॉ.नेहा भावे,प्रा.स्नेहल थोरात,इंजि.रोहिणी बनसोडे,भारती राठोड ,कोमल गोडबोले,इंजि.अभिलाषा नवघडे,रेखा पंडित,कुसुम बुक्तरे,डॉ.सुश्मिता ढवळे,प्रा.अनुपमा बनसोडे,प्रियंका तारू(बालविकास अधिकारी),ऍड. सागर माने ,प्रा.पुष्पलता ढगे इत्यादी मान्यवर महिलांसह ,अनेक बचत गट,सरपंच ,उपसरपंच ,पदाधिकारी ,महिला कार्यकर्त्यां यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
              या प्रसंगी उपस्थित महिलांना आंबेडकवादी मिशन तर्फे गौरव करून प्रमानपत्र वितरित करण्यात आले.प्रत्येक घरातील मुलींना उच्चशिक्षित करावे ,असे आवाहन प्रत्येक वक्त्यांनी केले.अंजनाबाई कागडे यांनी मजुरी करून आपल्या मुलाला डॉक्टर केले.तर जोंधळे आईनी आपल्या मुलाला मजुरी करून न्यायाधीश बनविले.शकुंतला हळदेकर यांनी आपल्या मुलीला ऑस्ट्रेलिया मध्ये  उच्च शिक्षणासाठी पाठविले .या मातांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित महिलांना  आपल्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण असेल तर  आंबेडकरवादी मिशनशी संपर्क करावा ,असे आवाहन या प्रसंगी दीपक कदम यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages