किनवट व माहूर तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत आ. केराम यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 March 2020

किनवट व माहूर तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत आ. केराम यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

किनवट व माहूर तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत आ. केराम यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

किनवट :  किनवट व माहूर तालुक्यातील विजेच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार भीमराव केराम यांनी राज्याच्या  मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून दोन्ही तालुक्यातील विविध   प्रश्नांची सोडवणूक करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नुकतीच केली आहे.
  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किनवट व  माहूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्रलंबित कामांना गती मिळावी व विजेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी दि.४ मार्च रोजी आमदार भीमराव केराम यांनी लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे. यात प्रामुख्याने आदिवासी बहूल भाग असलेल्या पांढरकवडा, कळवण व शहादा या ठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या स्वतंत्र विभागीय कार्यालयांच्या धर्तीवर भोकर येथील विभागीय कार्यालयाचे विभाजन करून किनवट येथे नव्याने विभागीय कार्यालयास मंजूरी देण्याबरोबरच, माहूर येथे मंजूर असलेल्या प्रस्तावित १३२ के.व्ही. उपकेंद्राचे काम सुरू करावे, प्रस्तावित मंजूर असलेल्या ३३ के.व्ही.उपकेंद्राचे काम सुरू करावे, माहूर तालुक्यातील मोहपूर येथे नव्याने ३३ के.व्ही. उपकेंद्रास मंजूरी द्यावी, १३२ के.व्ही. उपकेंद्र, किनवट ते माहूर लिंक लाईन मंजूर करून दोन्ही उपकेंद्र ग्रीडमध्ये जोडण्यात येण्यासाठी डब्ल्यु.बी.एस. स्कीम राबवण्यात यावी, सन २०१४ - १५ व २०१६ या वर्षात महावितरण आपल्या दारी या योजने अंतर्गत शेतक-यांच्या कृषीपंपासाठी विज जोडणी योजना राबण्यात आली. परंतू, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच किनवट माहूर तालुक्यातील सर्व ३३ के.व्ही. उपकेंद्रांची एम.व्ही.ए. क्षमता वाढवून सर्व ३३ के.व्ही. वाहिन्या व ११ के.व्ही. वाहिन्याची दुरूस्ती करून उपकेंद्रांतील उपकरणांची दुरूस्ती व्हावी. इत्यादी प्रलंबित व नविन कामे आदिवासी बहूल किनवट व माहूर तालुक्यासाठी  होण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. सदरची कामे नियोजित वेळेत पुर्ण झाल्यास दोन्ही तालुक्यातील विजेची समस्या जवळपास संपुष्टात येवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages