कोरोनाची दहशत; राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी व निमसरकारी शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने भारतात सुद्धा हातपाय पसवण्यास सुरूवात केली आहे. राज्यात कोरोनाच्या संशयित रूग्णांच्या संखेत वाढ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी इतर संक्रमित नागरिकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
राज्यातील शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असली तरी १० वी आणि १२ वी च्या परिक्षा नियमित वेळापत्रकाद्वारे घेण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच परिक्षेला येणाऱ्या परिक्षार्थींची योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना आरोग्य प्रशासनास दिल्या आहेत.
Saturday 14 March 2020
कोरोनाची दहशत; राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment