नाट्य-अभिवाचनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध प्रा. दत्ता भगत लिखित “पुस्तकी वांझ चर्चा” नाटकाने दिली आंबेडकरवाद्याच्या घुसमटीला अभिव्यक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 March 2020

नाट्य-अभिवाचनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध प्रा. दत्ता भगत लिखित “पुस्तकी वांझ चर्चा” नाटकाने दिली आंबेडकरवाद्याच्या घुसमटीला अभिव्यक्ती

नाट्य-अभिवाचनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध
प्रा. दत्ता भगत लिखित “पुस्तकी वांझ चर्चा” नाटकाने दिली आंबेडकरवाद्याच्या घुसमटीला अभिव्यक्ती
            

नांदेड : प्रख्यात नाटककार तथा विचारवंत प्रा. दत्ता भगत लिखित  व राहुल जोंधळे दिग्दर्शित “पुस्तकी वांझ चर्चा” या नवीन नाटकाच्या अभिवाचनाचा प्रयोग शनिवारी (दि.१४) सिनेस्टार अॅकॅडमी येथे संपन्न झाला. विरोधाभासपूर्ण भवताल आणि कौटुंबिक वातावरण यांच्या कोंडीत सापडलेल्या संवेदनशील आंबेडकरवाद्याच्या घुसमटीला अभिव्यक्ती देणार्‍या या नाटकाची अप्रतिम प्रकाश योजना, प्रभावी संगीत आणि कलावंताची अचूक शब्दफेक यांनी रसिक प्रेक्षकाला अक्षरश: मंत्रमुग्ध केले.
     कल्चरल असोसिएशन नांदेड व आंबेडकरवादी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नाट्य अभिवाचन कार्यक्रमात प्रारंभी नाट्य लेखक प्रा. दत्ता भगत यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष भीमराव शेळके, आंबेडकरवादी मंचचे अध्यक्ष राहुल जोंधळे, डॉ.राजेंद्र गोणारकर उपस्थित होते.
     हे नाटक म्हणजे आंबेडकरवादी विचारांनी जगण्याचा आग्रह धरणार्‍या प्रा. रत्नपारखीच्या विफलतेची कहाणी आहे. सवर्ण- दलित संघर्षाचे चित्रण अनेक नाटकातून आले आहे, पण रत्नपारखींचा संघर्ष स्वत:शीच असल्यामुळे उपस्थितांना त्याने अधिक अंतर्मुख केले.
  नाट्य- अभिवाचन विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे, हर्षा भुरे व प्रा. माया भालेराव यांनी केले. संगीत-प्रकाश वानोळे, प्रकाश योजना- माणिकचंद थोरात यांची होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश कवडे, भुजंग मुनेश्वर, करन गूडेवार आदी परिश्रम घेतले. यावेळी डॉ.आदिनाथ इंगोले, डॉ. अनंत राऊत, भीमराव हाटकर,राम वाघमारे, लक्ष्मण संगेवार, डॉ. सचिन सरोदे, प्रा.टी.डी.गायकवाड आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages