जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृति दिनाच्या च्या निमित्ताने सन्मान नारी शक्तीचा जागर लोकशाही चा करण्यासाठी गोर बंजारा होळी लैंगी नृत्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 March 2020

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृति दिनाच्या च्या निमित्ताने सन्मान नारी शक्तीचा जागर लोकशाही चा करण्यासाठी गोर बंजारा होळी लैंगी नृत्य

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृति दिनाच्या च्या निमित्ताने सन्मान नारी शक्तीचा जागर लोकशाही चा करण्यासाठी गोर बंजारा होळी लैंगी नृत्य


किनवट :जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृति दिनाच्या च्या निमित्ताने सन्मान नारी शक्तीचा जागर लोकशाही चा करण्यासाठी गोर बंजारा होळी लैंगी नृत्य उत्सवाचे आयोजन शिवनगरी, गोकुंदा(ता.किनवट)येथे धुली वंदनाच्या दिवशी आयोजित करण्यात आले होते.  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक ,डॉ अशोक बेलखोडे,माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक प्रा.डॉ. सुनील व्यवहारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

         बंजारा समाजात होळी सणाचे अधिक महत्व आहे. माघ अमावस्ये पासून फाग महोत्सवास सुरुवात होते. महिला व पुरुष गीत गात डफडया च्या तालावर नृत्य करतात. यावर्षी होळी चे औचित्य व जागतिक महिला दिनी लैंगी उत्सवाचे आयोजन करून महिलांचा सन्मान करण्यात  आला. जुनापाणी येथील प्रसिद्द सामकी माता महिला मंडळा च्या महिलांनी पारंपारिक गीत व नृत्य सादर करून नारी शक्तीचा जागर केला. या वेळी स्त्री भ्रूणहत्या, व्यसनाधीनता,बेटीबचाव बेटी पढाव,हुंडाबळी, स्त्री अत्याचार , तंटामुक्ती व ग्रामस्वच्छता अशा सामाजिक विषयांवर गीते प्रस्तुत करण्यात आली. प्रारंभी आयोजन समिती समन्वयक प्रा.डॉ. वसंत राठोड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू विषद केला. मान्यवरांनी महिला दिन व होळी महोत्सवा विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप जाधव, गोनेवार, श्रीमती पार्वतीबाई राठोड, प्रा. डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा. शोभा शिराढोनकर,जोशीं कोचिंग क्लासेस चे संचालक सदाशिव जोशी, कैलास चव्हाण, रुपसिंग जाधव,कैलास राठोड,मोहनसिंग चव्हाण,सुभाष राठोड,पांडुरंग राठोड, शाम राठोड, अनिल राठोड,इंदूबाई जाधव ,पारसमणी राठोड, नंदा राठोड, प्रा. विद्या चव्हाण यांच्या सह शिवनगरी येथील कर्मचारी, नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. के. राठोड यांनी केले मुख्याध्यापक घन:श्याम  राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages