उद्यापासून कोर्टाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 March 2020

उद्यापासून कोर्टाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २

उद्यापासून कोर्टाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २


किनवट : सध्या उद्भवलेल्या करोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या ता. १४ व १६ च्या परिपत्रकातील निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, नांदेड,कार्यालयीन आदेश ता.१६ अन्वये जिल्हा न्यायीक विभागातील सर्व न्यायालयांच्या  न्यायिक कामांच्या वेळा सकाळी ११ ते दुपारी  २ अशा बदलण्यात आल्या आहेत,हा बदल ता.१८ पासून प्रमुख जिल्हा न्यायाधीश दि.अ.धोळकिया यांच्या आदेशानुसार करण्यात आला आहे, अशी माहीत प्रभारी दिवाणी न्यायाधीश जे.एन.जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages