चिखली बु. येथील शौचालय बांधकाम भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा - उपसरपंच शेख आमन यांची मागणी
किनवट : स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालयाचे बांधकाम न करता लाभधारकांच्या खोट्या सह्या व अंगठे घेऊन ग्रामसेवक व सरपंच यांनी पैशाची उचल करून अपहार केला, असा आरोप, चिखली(बु.ता.किनवट) येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच शेख आमन शेख ईसा, कल्पना भीमराव पाटील, अश्विनी ज्ञानेश्वर माने(सर्व ग्राम पंचायत सदस्य) यांच्यासह पांडुरंग लांडगेवार ,अंबादास मेश्राम, लतिफाबी शेख रमजान यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नुकतीच केली होती.परंतु,त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे, यामुळे निवेदनकर्ते व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, चिखली बु.(ता.किनवट) येथील शौचालय लाभधारकांच्या खोट्या सह्या व अंगठे करून सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून रक्कमेची उचल करून विल्हेवाट लावली आहे. या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करून चौकशी करावी व भ्रष्टाचाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी योग्य ती चौकशी न झाल्यास सदरील प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन न्यायालयात दाद मागण्यात येईल,असा इशारा,उपसरपंच शेख आमन शेख ईसा यांनी दिला आहे.
Tuesday 17 March 2020
Home
तालुका
चिखली बु. येथील शौचालय बांधकाम भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा - उपसरपंच शेख आमन यांची मागणी
चिखली बु. येथील शौचालय बांधकाम भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा - उपसरपंच शेख आमन यांची मागणी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment