आपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा
नांदेड : आपत्कालीन कार्यात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करुन पास घेण्याची सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केली आहे. https://covid19.mhpolice.in या लिंकवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
ई-पास E Pass ची सुविधा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने
उपलब्ध करुन दिली असून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सदर लिंकवर आपला पासपोर्ट साईजचा फोटो 200 केबी पर्यंत तसेच इतर कागदपत्रे 500 केबी पर्यंत अपलोड करावीत. पास वापरासंदर्भातील नियमावली फॉर्म भरण्यापूर्वी वेब लिंकवर दिसून येते. अर्ज केवळ इंग्रजी भाषेत स्वीकारला जाणार असून अर्ज भरल्यानंतर मंजूर अर्जाची प्रत डाउनलोड करावी. त्याची ऑनलाईन प्रत सर्वांना सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकते. आपत्कालीन सेवा देणाऱ्यांसाठी ही सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे.
Tuesday, 31 March 2020

आपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment