कोरोना विषाणुच्या पाश्र्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परिक्षा रद्द; दहावीच्या परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 March 2020

कोरोना विषाणुच्या पाश्र्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परिक्षा रद्द; दहावीच्या परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार

कोरोना विषाणुच्या पाश्र्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या  परिक्षा रद्द; दहावीच्या परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार


मुंबईः कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा आज केली. दहावी परीक्षेचे राहिलेले पेपर मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इयत्ता नववी ते ११ वीच्या परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दहावी परीक्षेचे उर्वरित पेपर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेतले जातील, असे गायकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages