मद्य विक्रीची दुकाने 31 मार्च पर्यंत बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 20 March 2020

मद्य विक्रीची दुकाने 31 मार्च पर्यंत बंद

मद्य विक्रीचे दुकाने 31 मार्च पर्यंत बंद
नांदेड दि. 20 :- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3), विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-2), पॉपी-2 अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ ताडी विक्री केंद्र (टिडी-1) अनुज्ञप्ती शनिवार 21 मार्च ते मंगळवार 31 मार्च 2020 रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.
           या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages