जनता कर्फ्यूस पाठिंबा द्यावा आ.भीमराव केराम यांचे आवाहन !
किनवट : सध्या कोरोना विषाणू मुळे संपूर्ण भारत देशात भितीचे सावट निर्माण झालेले आहे.कोरोना संकटा विरुद्ध लढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(ता.२२)संपूर्ण देशात जनतेने जनतेसाठी करायच्या जनता कर्फ्यू चे आवाहन केलेले आहे,त्याला किनवट विधानसभा मतदारसंघातील जनतेने पाठिंबा देऊन अंमलबजावणी करावी,असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले आहे.स्वतः च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता आणि कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी आपण सर्वांनी रविवारी (ता.२२) सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपण आपल्या घरीच थांबून देशहिताला सहकार्य करावे, असे आमदार केराम यांनी म्हंटले आहे.
देश पातळीवर कोरोना विषाणू संकटावर मात करण्यासाठी राबत असलेल्या यंत्रणेतील सेवकांप्रती आभार व्यक्त करण्या साठी रविवारी सायंकाळी ५ वाजता आपल्या घरासमोर उभं राहून घंटानाद करावा,असे आवाहनही आमदार भीमराव केराम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment