जि.प.कें.प्रा.शाळामारेगाव (व) येथे कोरोनाविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
किनवट : जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मारेगाव (वरचे ता.किनवट ) येथील कलावंत शिक्षक सुरेश पाटील यांनी गावातील मारोती मंदीर येथे आज(दि.२१) गावकऱ्यांना कोरोनाविषयी सविस्तर माहिती दिली.
विविध गीतांमधून कोरोना हटाव देश बचाव, सारे गावकरी जागृत होऊ कोरोना मुक्त होवू . शिंकतांना किंवा खोकलतांना तोंडावर रुमाल धरावा किंवा कोपरा धरावा , काहीही खाण्यापिण्या आधी किंवा डोळे , तोंड या अवयवांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. बाहेर राज्यातून आलेल्या व्यक्तीने आरोग्य विभागाची तपासणी करुन घ्यावी. कोणतीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवां पसरवू नये , हातात हात मिळविण्यापेक्षा दोन्ही हात जोडून नमस्कार करावा,तोंडावर रूमाल किंवा मास्क वापरावे असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी रघुनाथ कोल्हे , अशोक जमदाडे , दिगांबर हासबे , आनंदा माने , दत्ता जमदाडे , पांडूरंग सातपुते , संग्राम मासाळ , गणेश वाघमारे , अनिकेत कोल्हे , सिध्दनाथ मासाळ या सह विद्यार्थी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment