जनता संचारबंदी ;काय करावे,काय करु नये,ही घ्यावी काळजी
नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग रहावे म्हणून रविवारी सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे. या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी घरातच रहावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात यापूर्वीच केले आहे.
चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या कोरोना विषाणुने जगभर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या विषाणुमुळे जगभरात दहा हजारहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. भारतातही पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा २९८ वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक ६४ कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता संचारबंदीचे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुमच्या मनातील शंकाचे निरस्सरण करणारे पाच मुद्दे
१.घरातच रहा, बाहेर पडू नका- सर्वात महत्वाचे म्हणजे जनता संचारबदीच्या काळात घरातच रहा. बाहेर पडू नका. आपल्या सोसायटी किंवा उद्यानातही फिरायला निघू नका. लोकांनी एकमेकांशी भेटू नये, म्हणूनच जनता संचारबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत ही जनता संचारबंदी लागू राहील.
२. कधी बाहेर पडू शकता?- शक्य तो घरातून अजिबात बाहेर पडायचे नाही, असा प्रयत्न करा. परंतु काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुम्ही घराबाहेर पडू शकता. रूग्णालयात जाणाऱ्यांना जनता संचारबंदीच्या काळात अडवले जाणार नाही. सोबत तुमच्या जवळपासच्या दूध- ब्रेडच्या दुकानावर जाण्यासाठीही तुम्ही घराबाहेर पडू शकता. कारण या जीवनाश्यक वस्तू आहेत, त्यासाठी तुम्हाला रोखले जाऊ शकत नाही.
३. कोणत्या लोकांना घराबाहेर पडण्याची मुभा?- पोलिस, माध्यमांचे प्रतिनिधी, डॉक्टर आणि सफाईची जबाबदारी असलेले लोक घराबाहेर पडू शकतात. कारण त्यांचे काम अत्यावश्यक आहे. या लोकांनी घराबाहेर पडणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, असे स्वतः मोदी यांनीच सांगितले आहे.
४. सायंकाळी ५ वाजता वाजवा टाळी, थाळी अथवा घंटी- रविवारी सायंकाळी ५ वाजता आपल्या घराची खिडकी, दरवाजे, बाल्कनीत उभे राहून डॉक्टर, पोलिस, माध्यमांचे प्रतिनिधी, सफाई कर्मचारी आणि होम डिलिव्हरी करणाऱ्यांचे ५ मिनिटे आभार व्यक्त करा. त्यासाठी टाळी, थाळी किंवा घंटी वाजवा, असे आवाहन मोदींनी केले आहे. सायंकाळी पाच वाजता सायरन वाजवून लोकांना याची सूचना द्या, असे आवाहनही राज्याच्या प्रशासनाला करण्यात आले आहे.
५. महत्वाचे म्हणजे हात धूत रहा- तुम्ही जनता संचारबंदीच्या काळात भलेही घरातच आहात, कुठेही बाहेर जाणार नसला तरी प्रत्येक २० मिनिटाला कमीत कमी २० सेकंदांपर्यंत हात आवश्य धुवा. तुम्ही भलेही थोड्या वेळापूर्वी हात धुतलेले असले तरीही जेवणाच्या आगोदर आणि शौचानंतर आवश्य हात धुवा.
Saturday 21 March 2020
जनता संचारबंदी ;काय करावे,काय करु नये,ही घ्यावी काळजी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment