कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय रास्तभाव दुकानामध्ये घ्यावयाची दक्षता
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणूचा प्रसार तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तुचे वितरण करतांना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारामार्फत धान्य मिळवणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट / अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही.
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानावर गर्दी न करता रास्त भाव दुकानदार अन्न-धान्य वितरणासाठी पात्र लाभार्थी यांना ज्याप्रमाणे टोकन देवून ज्या नियोजितवेळी दुकानावर धान्य घेण्यासाठी यावे अशा सुचना देतील, त्याचवेळेस रास्त भाव दुकानात जावून अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानात उचीत अंतर ठेवून रांगेत उभे राहतील. याची दक्षता रास्तभाव दुकानदार व लाभार्थ्यांनी घ्यावी, ही सुविधा 31 मार्च 2020 पर्यंत लागू राहील.
लाभार्थ्यांना मार्च 2020 कालावधीत धान्य मिळण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधीत तहसिल कार्यालयास दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधीत कार्यालयास ईमेल करावा अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाशी दुरध्वनीवरुन संपर्क अथवा ईमेल करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Friday, 20 March 2020

कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय रास्तभाव दुकानांमध्ये घ्यावयाची दक्षता
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment