कोरोनाचा प्रादुर्भाव रावखण्यासाठी 21 व 22 मार्च ला मराठवाड्यातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 March 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रावखण्यासाठी 21 व 22 मार्च ला मराठवाड्यातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 व 22 मार्चला मराठवाडयातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना



नांदेड दि. 20 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी  मराठवाडयातील आठही जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी आज व्हीसीव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे.  दि. 21 व 22 मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी  सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर  विभागीय आयुक्तांनी मराठवाडयातील आठही जिल्हयांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश  दिले आहेत.

सदर दोन दिवसांच्या बंदमधून पुढील आस्थापनांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शासकीय/निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने व औषधे दुकाने, विदयुत पुरवठा, ऑईल व पेट्रॉलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना वगळून आठही जिल्हयांतील सर्व आस्थापना व दुकाने दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी बंद ठेवावेत, असे विभागीय आयुक्तांनी सूचित केले आहे.
******

No comments:

Post a Comment

Pages