हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हिंगोली येथील शासकीय रुग्णालची केली पाहणी
कोरोनाचा प्रादुर्भावने संपूर्ण जग हादरलेले असुन भारतात खबरदारीचा उपाय म्हणून मागील काही दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत 31 मार्च आणि पुढील 21 दिवसांसाठी देशात संचारबंदी आणि लॉक डाऊन करण्यात आले असून ऊसतोड शेतमजूर आणि हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे याच पार्श्वभूमीवर आज प्रशासनाकडे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली हिंगोलीतील तसेच औंढा नागनाथ येथील सामान्य रुग्णालय भेट दिली रुग्णालयातील उपचार कक्ष आणि त्याबाबत आरोग्य विभागाने केलेल्या उपाय योजना बाबत माहिती घेतली तसेच मतदारसंघातील कळमनुरी, वसमत,सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने औषध उपलब्ध करून देण्याबाबत आणि येणाऱ्या काळात काम करणाऱ्या आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना पी.पी.किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांच्याकडे केली तसेच सर्वसामान्य जनतेनी कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर पडण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे, या वेळी उपस्थित कळमनुरीचे आमदार संतोषराव बांगर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर ,नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे,महानगरप्रमुख निखिल लातूरकर, समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे, नगरसेवक राम कदम, डॉ सोमेश्वर पतंगे, औंढा नागनाथ तालूकाप्रमुख साहेबराव देशमुख, डॉ.सुळे ताई,डॉ. शिंदे आदी कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते,
Friday 27 March 2020
Home
जिल्हा
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हिंगोली येथील शासकीय रुग्णालची केली पाहणी
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हिंगोली येथील शासकीय रुग्णालची केली पाहणी
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment