- Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 March 2020

बॅंक व फायनान्स कंपन्यांनी विविध कर्जांची हप्ते तिन महिन्यांसाठी पुढे ढकलावेत -स्वप्नील इंगळे पाटील यांची मागणी



*नांदेड* : बँक , फायनान्स कंपन्या , प्राइवेट फायनान्स कंपन्या व गृहकर्ज , वाहन कर्ज , मोबाईल कर्ज , इतर कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यानी त्यांचे हप्ते पुढील दोन - तीन माहिन्यापर्यन्त EMI  हप्ते पुढे ढकलावे व चेक बाउन्स चा दंड , हप्त्याचा दंड वसूल करु नये,असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे सदस्य स्वप्नील इंगळे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना नुकतेच पाठवले आहे.
   निवेदनात म्हटले आहे की,     राज्यात *कोरोना* सारख्या महा विषाणुंचा फैलाव जोरात सुरु आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरीक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने *जनता कर्फ्यू व लॉक डाऊन* सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचा परिणाम काही कामगारावर, त्यांच्या कामावर , पगारावर होणार आहे .
    काही कामगार तर असे ही आहेत की ज्यांच्या घरी कामावर गेल्या शिवाय जेवायला सुद्धा भेटत नाही. ओटो रिक्षा बंद असल्याने ओटो रिक्षा वाल्यांचे पण हाल होत आहे.  या महिन्यात कमाई खूपच कमी झाली आहे.  त्यामुळे रिक्षा , टेंम्पो , टु व्हिलर गाडीचे हप्ते, किवां वैयक्तिक पर्सनल लोन , ग्रर्ह कर्जाचे बँकेचे  हप्ते, सोसायटी चे हप्ते भरणे या दोन - तिन महिन्यामध्ये भरणे शक्य होणार नाही.
    या पाश्र्वभूमीवर आपण पुढील दोन - तीन माहिन्यापर्यन्त EMI हप्ते पुढे ढकलावे व चेक बाउन्स चा दंड , हप्त्याचा दंड वसूल करू नये.याबाबत संबंधितांना आपणाकडून आदेश व्हावेत.
      सर्व गरीब मजुर , सर्व विविध क्षेत्रातील कामगार वर्ग , एस. टी. महामंडळातील कामगार वर्ग, आॅटो रिक्षा वाल्ये, बचत गटाच्या माध्यमातून घर-संसारात हातभार लावून, मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन ताट मानेने,स्वाभिमानाने जिवन जगण्यासाठी धडपडणाऱ्या तळागाळातील तमाम महिलांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Pages