कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - आमदार भीमराव केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 March 2020

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - आमदार भीमराव केराम

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - आमदार भीमराव केराम




किनवट : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून नागरीकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले.
   कोरोना आजारा संदर्भात घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजनेसाठी आज आढावा बैठक घेण्यात आली.  किनवट विधानसभा मतदारसंघ मागास असल्यामुळे एकही गरजु नागरीक अन्नधान्यापासून वंचित राहाणार नाही, याची सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
        २७ मार्च २०२० रोजी आमदार भीमराव केराम यांच्या निवासस्थानी तातडीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तहसीलदार नरेंद्र देशमूख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उत्तम धुमाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय मुरमुरे, पोलीस निरीक्षक मारोती थोरात उपस्थित होते.
        कोरोना विषाणू (कोव्हीड १९) च्या  पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी सूचनांचे पालन केले पाहिजे. होम कोरोन्टाईंन्सांनी बाहेर फिरु नये. बाहेरच्या जिल्ह्यातून, परप्रांतातून व परराज्यातून आलेल्यांनी वैद्यकीय चाचणी करुन, स्वत:सह कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शिवाय संबंधित यंत्रणेनेही तशा व्यक्तींवर बारकाईने लक्ष देण्याचे सूचीत केले आहे.
         कोरोनामुळे ग्रामीन व अतीदुर्गम भागातील नागरीकांच्या हाताला काम नाही. उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सरकारने प्रत्येक कुटूंबास तीन महिन्याचे धान्य देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.याची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी हयगय होता कामा नये. शिधापत्रिकाधारक असो वा नसो, एकही कुटूंब त्यातून सुटला नाही पाहिजे. या विषयी जिल्हाधिका-यांशी केराम यांनी      संवाद साधला. बाहेरच्या राज्यात गेलेल्या नागरीकांनी शक्यतो असाल त्या ठिकाणीच सुरक्षित राहाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळांच्या दुकान चालकांना दुकान चालु ठेवण्यासाठी ओळखपासेस देण्यात आले आहेत. कांही पासेसधारक त्याचा आधार घेत कामकाजाशिवाय शहरात मोटारसायकलवरुन फिरतांना दिसत असल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. अशा आंबटशौकीनांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा तक्रारी येत आहेत. कारण गरजु लोकांना त्यांच्यापासून त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणेने नागरीकांच्या समस्या लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे  आवाहनही आमदार केराम यांनी केले. यावेळी अनिल तिरमनवार, मारोती भरकड, सुनिल गरड, संतोष मरसकोल्हे, अनिरुद्र केंद्रे, क्रांती केराम यांच्यासह काहीजन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages