कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेने आखल्या विविध उपाययोजना; नागरिकांनी पालन करण्याचे नगर परिषदेचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 March 2020

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेने आखल्या विविध उपाययोजना; नागरिकांनी पालन करण्याचे नगर परिषदेचे आवाहन

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेने आखल्या विविध उपाययोजना; नागरिकांनी पालन करण्याचे नगर परिषदेचे आवाहन




किनवट : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने स्थानिक स्तरावर या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नगर परिषदेने सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांचे आयोजन करुन त्या अंमलात आणल्या जात आहे, अशी माहिती, मुख्याधिकारी निलेश शेट्टी सुंकेवार यांनी दिली.
   शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झालेले आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी होणा-या निर्देशानुसार उपाययोजना चालु आहेत.शहरातील अत्यंत गरीब होतकरू,मजुरदार ज्यांना  या लाॅकडाऊनमध्ये काम मिळणे अशक्य झाले आहे,अशा कुटुंबाची माहिती गोळा करण्याचे काम चालु आहे.
    कोरोना ची आपत्कालीन परिस्थितीत हाताळताना नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार,सर्व सभापती,नगर सेवक,नगर सेविका यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.आपत्कालीन परिस्थितीमध्ये धोका पत्करून आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी आरोग्या निरिक्षण चंद्रकांत दुधारे व सर्व विभाग प्रमुख प्रयतनाची पराकाष्ठा करत आहेत.*कोराना पळवा-आरोग्य मिळवा* या बोधवाक्यानूसार नागरिकांनी स्वत:च्या परीवाराची आरोग्य काळजी घ्यावी,असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages